मुंबई

अपघातात मृत महिलेचे दागिने चोरी?

CD

अपघातात मृत महिलेचे दागिने चोरी?
व्हिडिओ व्हायरल
कुर्ला अपघातात एकीकडे जात-धर्म विसरून माणुसकी म्हणून जखमींना तत्काळ रुग्णालयात दखल करण्याची धावपळ दिसली, तर दुसरीकडे बुधवारी (ता.११) व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे अनोळखी व्यक्तीने मृत महिलेच्या हातातील सोन्याचे दागिने काढून घेतल्याचा प्रकारही समोर आला.

अपघातग्रस्त बसने डॉ. आंबेडकर नगर येथे कमनीला धडकून थांबण्याआधी फातिमा अन्सारी या महिलेला चिरडले होते. ही महिला नगराला लागून असलेल्या देसाई क्लिनिकमध्ये आया म्हणून काम करते. बसखाली तिचा मृतदेह अडकून पडला होता. जमलेली गर्दी तो बाहेर काढण्याच्या बेतात असताना एक हेल्मेटधारी तरुण तेथे आला आणि त्याने फातिमा यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या उतरविण्यास सुरुवात केली. गर्दीतून त्यास विरोधही केला गेला, मात्र या महिलेचा मोबाइल फोन माझ्याकडेच आहे. तिच्या घरच्यांचा फोन आला तर मोबाइलसोबत तिचे दागिनेही देईन, असे हा तरुण सांगताना दिसतो. या घटनेची माहिती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांना मिळाली. तत्पूर्वी फातिमा यांच्या कुटुंबाने मृतदेहासोबत नेहमीचे दागिने नाहीत, असा दावा केल्याचे समजते. या प्रकरणी कुर्ला पोलिस अधिक तपास करीत आहेत.


बसमधील प्रवाशांचा शोध सुरू
अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे पोलिसांना चौकशी करायची आहे. त्यांच्या विशेषतः चालक संजय मोरे यांच्या शेजारी किंवा मागील बाजूस बसलेल्या, उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जबाब तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल, असा अंदाज पोलिसांना व्यक्त केला आहे.

बसमधील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात
पोलिसांनी अपघातग्रस्त बसमधील सीसीटीव्ही चित्रण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. या चित्रणात बस सुरू झाल्यापासून कमानीला धडकून थांबेपर्यंतचे चित्रण आहे. बसच्या हेलकाव्यांमुळे आणि काचेतून दिसणाऱ्या भीषण नजाऱ्यामुळे आतील प्रवाशांची उडालेली भंबेरी, तोल सांभाळण्यासाठी सुरू असलेली धडपड स्पष्ट दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT