मुंबई

अभिनेता मुश्ताक खान यांचेही अपहरण

CD

अभिनेता मुश्ताक खान यांचेही अपहरण
पाल, खान अपहरणामागे एकच टोळी; दहा संशयितांना अटक

मुंबई, ता.११ : हास्य कलाकार सुनील पाल यांच्याआधी अभिनेता मुश्ताक खान यांचे बिजनोर भागात अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या दोन्ही घटना एकाच टोळीने घडविल्याचा संशय असून उत्तर प्रदेश पोलिसांनी १० संशयितांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे.
पाल यांचे २ डिसेंबरला मेरठ येथून अपहरण करण्यात आले. सुमारे साडेसात लाख रुपये घेऊन अपहरकर्त्यांनी त्यांना सोडले. तर खान यांचे २० नोव्हेंबरला दिल्ली विमानतळावरून अपहरण करण्यात आले. बिजनोर येथे त्यांना १२ तास ठेवण्यात आले. मात्र खान यांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत स्थानिकांच्या मदतीने घर गाठले. या दोघांना एका कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते, आगाऊ मानधन प्रवास खर्च, विमान तिकिटेही देण्यात आली होती. पाल यांच्या जबाबावरून मुंबईच्या सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आणि तो तपासासाठी मेरठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.

मेरठचे पोलिस अधीक्षक विपिन ताडा यांनी दिलेल्या माहितीनुसार मेरठ आणि बिजनोर पोलिसांनी सुमारे दहा संशयितांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे. यातील एक व्यक्ती बिजनोर गेस्ट हाऊसचा सुरक्षा रक्षक आहे. तर दुसरी व्यक्ती व्यवस्थापक आहे. अपहरणानंतर पाल व खान यांना याच गेस्ट हाऊसमध्ये ओलीस ठेवण्यात आले होते. खान यांच्याकडे अपहरणकर्त्यांनी १ कोटी रुपयांची मागणी केल्याचे समजते. दरम्यान, पाल यांची सुटका केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी एक ध्वनीफित व्हायरल केली. त्यातील संवाद ऐकल्यावर पाल व अपहरणकर्ते एकमेकांना ओळखतात असा संभ्रम निर्माण होतो. मात्र ही ध्वनिफीत अर्धवट असून पाल यांना बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्सर व्हायरल केल्याचा दावा त्यांच्या पत्नीने मेरठ पोलिसांसमोर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT