मुंबई

महापालिका शाळेतील ६०५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

CD

महापालिका शाळेतील ६०५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर पालिकेची कौतुकाची थाप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवीच्या परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील एकूण ६०५ विद्यार्थांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. यामध्ये पाचवीच्या ३१७ आणि इयत्ता आठवीच्या २८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचा पालिकेच्या वतीने गौरव करण्यात आला.

भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे शुक्रवारी (ता. १३) या गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर अणि शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांच्यासह सर्व उपशिक्षणाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत महापालिकेच्या शिक्षण विभागातील इयत्ता पाचवीच्या ३१७ आणि इयत्ता आठवीच्या २८८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या परीक्षेत भरूचा रोड पालिका मराठी शाळा क्रमांक दोनमधील इयत्ता पाचवीतील संचिता कांबळे हिने ७६.८७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. एल. के. वाघजी एम.पी.एस. शाळेतील वेदिका सावंत या विद्यार्थिनीने ७६.८७ टक्क्यांसह द्वितीय तर देवनार वसाहत पालिका शाळेतील शिवम वर्मा या विद्यार्थ्याने ७२.१० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. दुसरीकडे दिंडोशी वसाहत पालिका हिंदी शाळा क्रमांक एकमधील इयत्ता आठवीतील सनिका सिंग हिने ६५.७७ टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. विलेपार्ले पूर्व एमपीएस शाळेतील रिद्धी कांबळे हिने ६४.४२ टक्के गुणांसह द्वितीय तर सहकारनगर शताब्दी सोहळा हिंदी शाळा क्र. एकमधील रोहित पुखराम बालोटिया याने ६४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.

.......
गुणवत्तेचा आलेख चढता
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवीच्या परीक्षेत २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख हा चढता आहे. २०२२मध्ये या परीक्षेत इयत्ता पाचवीच्या २०२ विद्यार्थीपैकी १८४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. तर, २०२३मध्ये ५३७ विद्यार्थ्यांपैकी २८९ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलचा साठा किती? इंडियन ऑइलने इंधन टंचाईच्या प्रश्नावर दिलं स्पष्टीकरण

Meta Anti-Scam Tool: WhatsApp-Facebook वर स्कॅमर्सची खैर नाही! मेटाचे नवे अ‍ॅण्टी-स्कॅम टूल्स लॉन्च, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना मोठा झटका

Circuit Bench Kolhapur : सर्कीट बेंचचे पोलिस अधीक्षक, बार असोसिएशनवर कडक शब्दात ताशेरे, महिला वकिल मारहाण प्रकरण

महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण आहेत? निवेदिता सराफ यांनी काय दिलं उत्तर? वाचून वाटेल कौतुक

US India Oil Deal: रशियन तेल खरेदी करू शकता, अमेरिकेनं भारताला दिली ३० दिवसांची सूट

SCROLL FOR NEXT