मुंबई

Mumbai: रस्ते प्रकल्पाची आयआयटी मुंबईकडून पाहणी; कामाच्या दर्जा, गुणवत्तेसाठी मार्गदर्शन

Latest Mumbai News: सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा दर्जा तपासात गुणवत्तेसाठी पालिकेच्या अभियंत्यांना मार्गदर्शनही केले.

सकाळ वृत्तसेवा

महानगरात विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) येथील चमूने परिमंडळ सातमध्ये आर उत्तर विभागअंतर्गत दहिसर येथे गुरुवारी (ता. १२) मध्यरात्रीनंतर भेट दिली. सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा दर्जा तपासात गुणवत्तेसाठी पालिकेच्या अभियंत्यांना मार्गदर्शनही केले.

महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण कामांचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी आयआयटी मुंबईची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून महापालिकेच्या वतीने नेमणूक करण्यात आली आहे. रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना आवश्यक तो दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी या संस्थेकडे आहे. या आयआयटी मुंबईच्या चमूमध्ये प्रा. सोलोमॉन यांच्यासह चार सदस्यांचा समावेश होता. यावेळी पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते.

सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने विविध निकषांची या चमूने पाहणी केली. सिमेंट काँक्रीटचे चौकोनी तुकडे (क्यूब), रेडिमिक्स काँक्रीटच्या पावत्या आणि बॅचचा अहवाल यावेळी तपासण्यात आले. तसेच काँक्रीटचे तापमान, स्लम्प चाचणी आदी चाचण्याही यावेळी करण्यात आल्या.

मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत हा पाहणी दौैरा पार पडला. यावेळी आयआयटी मुंबईच्या पथकाने पालिकेच्या अभियंत्यांना मार्गदर्शन करत विविध आव्हानात्मक विषयांच्या अनुषंगाने चर्चा केली.

काँक्रीटीकरण सुरू असताना घ्यावयाच्या चाचण्या व प्रत्यक्ष हवामानातील बदल आणि तापमानानुसार प्रत्यक्षस्थळी करावयाच्या उपाययोजना याबाबत करावयाच्या चाचण्या यांचीही माहिती दिली. सोबतच हवेतील आर्द्रता व वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग याचा अभ्यास करण्यासाठी मोबाईल ॲपच्या वापराबाबतही अभियंत्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

७०१ किलोमीटर रस्त्याची कामे
महापालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रीटीकरणासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी आयआयटी मुंबईची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली. दुसऱ्या टप्‍प्‍यातील पाच पॅकेज आणि पहिल्‍या टप्‍प्‍यातील एक पॅकेजच्‍या कामांची गुणवत्ता तपासणी व आनुषंगिक कामे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT