मुंबई

राष्ट्रीय उद्यान वाचवणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी

CD

राष्ट्रीय उद्यान वाचवणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी
एकही बांधकाम नको; उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेकायदा बांधकामांवरून मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १३) राज्य सरकारला खडे बोल सुनावले. राष्ट्रीय उद्यानात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामे वाढत असून याठिकाणी आम्हाला एकही बांधकाम नको, राष्ट्रीय उद्यान वाचवणे प्रत्येकाचीच जबाबदारी असून ही जबाबदारी कोणीही झटकू नये, अशा शब्दांत मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने सरकारचे कान टोचले.

मुंबईलाच जोडून असलेले बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लाखो वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असून याठिकाणी जंगली प्राण्यांचा वावरदेखील आढळून येतो. पर्यावरण दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय उद्यानात गेल्या काही वर्षांत बेकायदेशीर बांधकामे वाढली असून वाढत्या नागरी वस्त्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास वाढत आहे. याप्रकरणी न्यायालयाने येथील बांधकामे हटविण्याचे आदेश दिले होते; मात्र या आदेशाची पूर्तता न झाल्याने कंझर्वेशन ॲक्शन ट्रस्ट या संस्थेने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी युक्तिवाद केला. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, ‘न्यायालयाने दिलेले आदेश पाळले जात नाहीत. येथील बांधकामांवर कारवाई करूनही ही बांधकामे पुन्हा उभी राहत आहेत; इतकेच नव्हे तर ती वाढत असून त्याचा परिणाम येथील जैवविविधतेवर होत आहे. न्यायालयाने याची दखल घेत राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले व कठोर शब्दांत जाब विचारला.

पुनर्वसनासाठी रहिवासी न्यायालयात
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वर्षानुवर्षे राहणाऱ्या रहिवाशांनी पुनर्वसनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळल्याने त्यांनी याचिका दाखल केली आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर या दोन्ही याचिकांवर सोमवारी (ता. १६) सविस्तर सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT