शैक्षणिक साहित्याच्या विक्रीत गैरव्यवहार
नाशिकमधील आंतरराष्ट्रीय शाळेच्या प्राचार्यासह तिघांविरोधात गुन्हा
मुंबई, ता. १३ : शैक्षणिक साहित्याची निर्मिती, विक्री करणाऱ्या चेतना एज्युकेशन कंपनीची ३४.५ लाख रुपयांना फसवणूक केल्याच्या आरोपात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुरुवारी (ता. १२) नाशिक येथील आंतरराष्ट्रीय शाळेच्या प्राचार्यासह कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला. या कंपनीतर्फे शालेय शिक्षण साहित्य देशभर पुरवले जाते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साहित्य विक्रीसाठी कंपनीने किमान दोन विक्रेत्यांची नियुक्ती केली होती. नाशिकमधील जितेंद्र साळवे याने जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नावे कंपनीकडून साहित्य मागवले. त्यातील काही साहित्य या शाळेने घेतले. उर्वरित साहित्य साळवे याने या शाळेच्या प्राचार्या चित्रा घस्टे यांच्याशी संगनमत करून खुल्या बाजारात विकले. या साहित्याची किंमत २६ लाख इतकी होती, तर रत्नागिरीमधील संतोष जगताप यांनी एका शाळेला विकलेल्या साहित्याचे सुमारे आठ लाख रुपये कंपनीकडे जमा ना करता स्वतः वापरले, असा चेतना एज्युकेशन कंपनीने आरोप केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी प्राचार्या घस्टे, साळवे आणि जगताप यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.