तीन ब्लॅक स्पॉट वरून सुरक्षित प्रवास
ओबेरॉय मॉल जंक्शन, एचबीटी ट्रॉमा केअर सेंटर जंक्शन आणि बिस्लेरी जंक्शनचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई , ता. १९ : आता तीन अपघातप्रवण क्षेत्रांतून (ब्लॅक स्पॉट) मुंबईकरांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. त्यासाठी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये ओबेरॉय मॉल जंक्शन, एचबीटी ट्रॉमा केअर सेंटर जंक्शन आणि बिस्लेरी जंक्शनचा समावेश आहे. मुंबई वाहतूक पोलिस आणि मुंबई महापालिका आणि रस्ते सुरक्षा यांच्या संयुक्त उपक्रमातून या उपाययोजना केल्या आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांनी बुम्बबर्ग फिलॅन्ट्रोपीस इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी भागीदारांच्या सहकार्याने वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडणाऱ्या तीन महत्त्वाच्या जंक्शनवर उपाययोजना केल्या आहेत. ओबेरॉय मॉल जंक्शन (गोरेगाव-मुलुंड लिंक रोड ), एचबीटी ट्रॉमा केअर सेंटर जंक्शन (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड) आणि बिस्लेरी जंक्शनचा (एन. एस. फडके मार्ग) येथे चाचणी प्रकल्प सुरू केला आहे. डब्ल्यूआरआय इंडिया आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह तीन ब्लॅक स्पॉट्स सुधारण्यासाठी काम करीत आहेत.
जास्त वळण असल्याने वाहनाचा वेग वाढणे, क्रॉसिंग व थांब्यांचा अभाव आणि कमी वापरात असलेल्या जागांचा पार्किंगसाठी वापर इत्यादी कारणांमुळे अपघात घडतात. त्यामुळे मृत्यू आणि गंभीर दुखापतींची संख्या कमी करणे तसेच वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिस, डब्ल्यूआरआय इंडिया, जीडीडीसी विविध पायाभूत सुधारणा करीत आहे. यामध्ये महामार्गावरील वेग कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, पादचारी क्रॉसिंगची सुविधा निर्माण करणे, रस्ता ओलांडण्यासाठी थांबा करणे, बॅरिकेड्स, पेंट्स यासारख्या अल्पकालीन उपाय, दिशादर्शकांचा वापर करण्यात आला.
कुठे काय उपाययोजना ?
जंक्शनचे क्षेत्रफळ सुमारे २,४५० चौरस मीटरवरून १,३२० चौरस मीटरपर्यंत कमी केले आहे. यामुळे पादचाऱ्यांसाठी ८२० चौरस मीटर क्षेत्र तयार झाले.
सिग्नलच्या टप्प्यात पादचाऱ्यांना थांबण्यासाठी सिग्नलचे टप्पे आणि मोकळी जागा नाही, ज्यामुळे वेगाने वाहने येतात. सिग्नल ओलांडण्यापूर्वी पादचाऱ्यांना वाट पाहण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी १,७४५ चौरस मीटर जांगा देण्यात आली आहे. बॅरिकेड्स वापरून तात्पुरते थांबे तयार केले आहेत. क्रॉसिंगचे अंतर १५ मीटरवरून ९ मीटरपर्यंत कमी केले आहे.
--
प्रायोगिक अंमलबजावणीमुळे आम्ही नवीन डिझाइनचे मूल्यांकन करणार आहोत. तसेच त्या माहितीच्या आधारे त्यांना कायमस्वरूपी बनवण्याची शिफारस करू. यामागे अपघात कमी करणे आणि रस्ते अपघातातील मृतांची संख्या कमी करणे हा उद्देश आहे.
- मितेश घट्टे, उपायुक्त , मुंबई वाहतूक पोलिस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.