जिल्हा बँक ते ग्रामीण विकास संस्था साखळी मजबूत करण्याची गरज
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ
मुंबई, ता. ७ : ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी गावातल्या विकास सहकारी सोसायटी ते जिल्हा बँक ही साखळी मजबूत करण्याची गरज आहे. त्याकरिता जिल्ह्यातील सहकाराचे सर्व आर्थिक व्यवहार सहकारी जिल्हा बँकेतूनच करावेत, असे आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज येथे केले.
राज्यातील शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सहकाराला ताकद देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सहकाराचे आर्थिक व्यवहार जिल्हा सहकारी बँकेमार्फतच करण्याचा प्रयोग शहा यांनी गुजरातमध्ये केला व त्या एका जिल्हा बँकेच्या ठेवी वर्षभरात चार हजार कोटी रुपयांनी वाढल्या. राज्यातही असा निर्णय करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मोहोळ यांनी केले. लवकरच देशात सहकाराचे प्रशिक्षण देण्यासाठी सहकार विद्यापीठ सुरू होईल. येत्या संसद अधिवेशनात त्यासंदर्भातील विधेयक संमत होईल, असेही मोहोळ यांनी सांगितले. आपल्याला जिल्हा बँकांना ऊर्जितावस्थेत आणावयाचे आहे. सहकार चळवळीत एकत्रितपणे काम करून पाच वर्षांत राज्याला प्रगतिपथावर नेऊ आणि प्रत्येक घटक सहकाराशी जोडू, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
...
कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा!
सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, शिवाजी कर्डिले, जयंत पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर या वेळी हजर होते. बँकेच्या विकासात कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असून, त्यांच्यामुळेच बँकेची नफा व उलाढाल वाढली, असे अनास्कर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.