मुंबई

बसण्याच्या जागेवरून वर्गात चाकूहल्ला

CD

मुंबई ः वर्गात कोण कुठे बसणार, या क्षुल्लक वादातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मित्राच्या मदतीने दोन सहकारी विद्यार्थ्यांवर शाळेतच चाकूहल्ला केला. अँटॉपहील येथील सनातन धर्म हायस्कूलमध्ये सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रिलिअम परीक्षा सुरू आहे. सकाळी नेहमीप्रमाणे प्रार्थनेसाठी शिक्षक आणि अन्य विद्यार्थी तळमजल्यावर असताना चौथ्या मजल्यावरील वर्गात जागेवरून चौघांमध्ये वाद झाला होता. आरोपींपैकी एका विद्यार्थ्याने रागाच्या भरात सहकाऱ्याकडील चाकूने दोन विद्यार्थ्यांवर वार केले. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एका विद्यार्थ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आरोपी आणि जखमी विद्यार्थी दहावीच्या एकाच तुकडीत शिकत असून, त्यांच्यात कोणतेही पूर्ववैमनस्य नसल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे, तसेच आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. या प्रकरणात सामायिक इराद्याने हत्येचा प्रयत्न, घातक हत्यार बाळगणे आणि त्याचा वापर करत इतरांना गंभीर जखमी करणे या कलमांनुसार गुन्हा नोंदवला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT