शिवशाही मानखुर्दमध्ये उभारणार गगनचुंबी इमारती
- ३०० हुन अधिक घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार; वाढीव एफएसआयचा लाभ घेण्यासाठी जुनी दुकाने पडणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने आता शिवशाही पुनर्वसन प्रकल्पानेही विक्रीयोग्य घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मानखुर्द येथे शिवशाहीची तब्बल १८०० चौरस मीटर जागेवर एकमजली ३२ दुकाने आहेत. त्याजागी तब्बल २८ मजली इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे शिवशाहीला विक्री योग्य घरे उपलब्ध होणार आहेत.
झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी राज्य सरकारने १९९५ मध्ये शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड (एसपीपीएल) या सरकारी उपक्रमाची स्थापना केली आहे, मात्र गेल्या दशकभरापासून शिवशाहीकडे प्रकल्पच नाहीत. त्यामुळे अडगळीत गेलेल्या या उपक्रमाला उभारी देण्याच्या हलचाली व्यवस्थापकीय संचालक आझिज शेख यांनी सुरू केल्या आहेत. त्यानुसार रखडलेले एसआरए प्रकल्प ताब्यात घेऊन मार्गी लावणे, नवीन इमारती उभारल्या जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे शिवशाहीच्या मालकीच्या दुकानाच्या जागेवर वाढीव एफएसआय वापरून २७-२८ मजली इमारत उभारण्यात येणार आहे.
३०० घरे तयार होणार
सध्या असलेल्या ३२ दुकानाच्या जागी मोठी इमारत उभारली जाणार आहे. त्याच्या तळमजल्यावर व्यावसायिक दुकाने, पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे, तर वरील मजल्यांवर तयार होणारी घरे विकली जाणार आहेत. त्यामुळे शिवशाहीला मोठा निधी उपलब्ध होऊ शकेल, असे शिवशाहीचे व्यवस्थापकीय संचालक आझिज शेख यांनी सांगितले.
- शिवशाहीने मानखुर्द येथे रिकाम्या जागेवर इमारत उभारली तेव्हा कमी एफएसआय मिळत होता. त्यामुळे उंच इमारत उभारून जास्त घरे तयार करणे शक्य नव्हते, मात्र आता अडीचहुन अधिक एफएसआय मिळू शकणार आहे. त्याचा वापर करून नवी दुकाने आणि घरे उभारण्याचे नियोजन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.