सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : म्हाडाच्या जागेवर उभ्या असलेल्या होर्डिंगबाबत नवे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार होर्डिंगच्या मजबुतीबाबत वेळोवेळी थर्ड पार्टी ऑडिट करणे बंधनकारक केले जाणार असून, उंची तसेच रुंदीवरही मर्यादा येणार आहे.
घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी म्हाडाने आपल्या धोरणात होर्डिंगच्या मजबुतीकरणावर भर दिला आहे. सद्यःस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाच्या भूखंडावर ६२ होर्डिंग आहेत. त्यापैकी दोनच होर्डिंगवर म्हाडाने कारवाई केली आहे, तर उर्वरित होर्डिंगचे काय करावे, नव्या होर्डिंग उभारण्याच्या नियमावलीसाठी स्वतंत्र धोरण म्हाडाकडून तयार केले आहे. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेली होर्डिंग आणि नव्याने होर्डिंग उभारणी परवानगी देताना होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे सक्तीचे केले जाणार आहे.
--------------------------------
महत्त्वाचे मुद्दे
- वादळ-वाऱ्यात होर्डिंग कोसळू नये, त्यावर आदळणाऱ्या वाऱ्याचा ताण कमी व्हावा म्हणून विशिष्ट पद्धतीने रचना करावी लागणार आहे.
- सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-कॉलेज किंवा रस्त्याला लागून होर्डिंग असू नये. तसेच परवानगी देताना त्याचा विचार केला जाणार आहे.
- उंच होर्डिंगसाठी मोठ्या प्रमाणात लोखंड वापरावे लागत असल्याने अवजड होतात. त्यामुळे उंची आणि रुंदीवर मर्यादा आणली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.