मुंबई

टोरेसच्या संचालकांसह तिघांना बेड्या टोरेसच्या संचालकांसह तिघांना बेड्या

CD

टोरेसच्या संचालकांसह तिघांना बेड्या
दागिने, रोकड घेऊन पसार होण्यापूर्वीच कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीच्या संचालकांसह तिघांना शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी (ता. ७) बेड्या ठोकल्या. कंपनीचे संस्थापक, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीए यांचा शोध सुरू असून, त्यांच्या नावे लूकआऊट नोटीस जारी केल्याचे सांगण्यात आले. तानिया कासातोव्हा, सर्वेश सुर्वे आणि व्हॅलेंटिना गणेश कुमार अशी अटक आरोपींची नावे आहेत.
प्लॅटिनम हर्न प्रा. लि. कंपनीतर्फे टोरेस ज्वेलरी ब्रँड गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई महानगर प्रदेशात सुरू करण्यात आला. प्रत्यक्षात दागिने विक्रीऐवजी कंपनीने फसव्या गुंतवणूक योजना आणल्या. सुर्वे हा कंपनीचा संचालक, उझबेकिस्तानी नागरिक तानिया ही व्यवस्थापक, तर रशियन नागरिक व्हॅलेंटिना स्टोअर मॅनेजर आहे. महामुंबईतील पाच शाखांवर गोंधळ उडाल्यावर हे तिघे पोबारा करण्याच्या तयारीत होते; परंतु तत्पूर्वीच त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. तिघांकडून दागिने आणि रोख रक्कम जप्त केल्याचे सांगण्यात आले. कंपनीचा संस्थापक जॉर्न कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेन्को हे युक्रेनचे नागरिक असून ते पसार झाले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी तौफिक शेख आणि सीए अभिषेक गुप्ता हे दोघेही भारतातच असून, ते परदेशात पसार होऊ नयेत म्हणून त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केल्याचेही सांगण्यात आले.
----
सव्वा लाख गुंतवणूकदार
टोरेसच्या फसव्या योजनांमध्ये आतापर्यंत सव्वा लाख गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
----
थर्टी फर्स्टच्या रात्रीही गुंतवणुकीसाठी रांगा
१. गुंतवणूकदारांच्या पैशांचा अपहार करून दुकान बंद करण्याची तयारी कंपनीने डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरू केली होती. जाता जाता अधिकाधिक रक्कम सोबत नेता यावी, या उद्देशाने या आठवड्यात कंपनीने परतावा थकावला.
२. गुंतवणूकदारांनी चौकशी केली तेव्हा चालू आणि पुढच्या आठवड्याचा परतावा एकत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले. मागील १० महिने दर आठवड्याला बँक खात्यावर परतावा जमा होत असल्याने गुंतवणूकदारांनी विश्वास ठेवला.
३. या वेळी कंपनीने रोख गुंतवणूक केल्यास ठरावीक दिवसांत दुप्पट परतावा देणारी योजना सुरू केली. त्याच विश्वासावर असंख्य गुंतवणूकदारांनी २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पुन्हा लाखो रुपयांची रोख गुंतवणूक केली.
४. अधिक परतावा मिळेल म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्रीदेखील कंपनीच्या पाचही शाखांवर लाखोंची रोकड घेऊन आलेल्या गुंतवणूकदारांची रांग लागली होती
-----
संचालक निघाला आधार कार्ड ऑपरेटर
कंपनीत संचालक म्हणून वावरणारा सर्वेश सुर्वे हा प्रत्यक्षात मुंबईत आधार कार्ड ऑपरेटर म्हणून काम करीत होता. त्याला महिना २२ हजार पगार देत संचालक बनविण्यात आले होते, अशी माहिती अटकेनंतर सुर्वेने पोलिसांना दिली. उमरखाडी येथून त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT