मुंबई, ता. ७ : सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. तसेच या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केली. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. या वेळी जूनपर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षान्त समारोह करावा, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारोह राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ७) सर कावसजी जहाँगीर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्या शाखांतील एक लाख ६४ हजार ४६५ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ८५ हजार ५११ मुली, तर ७८ हजार ९५४ मुलांचा समावेश होता. या वेळी महाविद्यालये विद्यापीठ विभागांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेकडे लक्ष वेधताना विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून, पदवी प्राप्त केल्यानंतरदेखील आयुष्यभर सुरू राहते. तसेच विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना टाळताना स्वतःच्या गतीने शिकत राहिले पाहिजे, असे सांगितले. या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रा. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि परीक्षा व मूल्यपामन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
-------------------------------------------------------
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने, नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. यातून भारताच्या संशोधन परिसंस्थेला बळकटी, सहयोगी प्रयत्नांना सुलभ करण्यासाठी आणि तांत्रिक प्रगतीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-प्रा. अभय करंदीकर, सचिव, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.