अमृत नोनी ऑर्थो प्लसची क्लिनिकल चाचणी यशस्वी
मुंबई, ता. १६ : अमृत नोनीने आपले प्रमुख उत्पादन असलेल्या अमृत नोनी ऑर्थो प्लससाठी मानवी क्लिनिकल चाचण्यांचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची माहिती शुक्रवारी (ता.१६) देण्यात आली. संधिवाताने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
औषध चाचण्यांसाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या काटेकोर मार्गदर्शक तत्त्वांनुसार नालंदा क्लीनसर्व्हच्या सहकार्याने ही चाचणी झाली. त्याद्वारे रुग्णांसाठी प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण आयुर्वेदिक औषध आणल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला. या यशस्वी क्लिनिकल चाचणीनंतर व्हॅल्यू प्रॉडक्ट्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. के. श्रीनिवास मुर्थी यांनी बंगळूर येथे ही माहिती दिली. तर मुंबईतदेखील कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही बाब जाहीर केली. भारतात लक्षावधी रोग संधिवाताने त्रस्त आहे. या व्याधीमध्ये अनेक प्रकार असून, आता तरुणांसाठीदेखील संधिवात त्रासदायक ठरतो आहे. या व्याधीवर पूर्ण उपचार नसला तरी सुरक्षित आणि अधिक प्रभावी उपचारपद्धतीतून वेदना कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो, असे आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदीप बेंकल म्हणाले. तणावग्रस्त आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे संधिवात हा तरुणांसाठीही त्रासदायक झाला आहे, असे व्हॅल्यू प्रोडक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. के. श्रीनिवास मुर्थी यांनी सांगितले.
..
सर्वाधिक विक्री होणारे औषध
अमृत नोनी हे उत्पादन गेल्या १५ वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये विश्वासार्ह नाव बनले आहे. या अद्ययावत क्लिनिकल चाचणीतून, ऑस्टियोआर्थरायटिस, रूमेटॉइड आर्थरायटिस आणि गाउट सारख्या विकारांवर उपचारासाठी अमृत नोनी ऑर्थो प्लसने आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखविल्याचे ओमश्री मार्केटिंग सोल्युशन्स प्रा. लि.च्या व्यवस्थापकीय संचालक मंगलाम्बिके यांनी सांगितले. अमृत नोनी ऑर्थो प्लस हे सांधेदुखीवरील भारतातील सर्वाधिक विक्री होणारे औषध आहे. देशातील ३० लाख लोकांना गुडघेदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी या विकारांवर त्याचा फायदा झाल्याचे नालंदाचे संशोधन प्रमुख डॉ. के. वेंकटेश्वरलू यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.