मुंबई

आरोग्य योजनांचे दूत व्हा

CD

आरोग्य योजनांचे दूत व्हा
मंत्री हसन मुश्रीफ यांचे डॉक्टरांना आवाहन; जेजे रुग्णालयात विविध विभागांचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक यंत्रसामग्री व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. रुग्णालयात येणाऱ्या सामान्य माणसाला उत्तम प्रकारचे उपचार मिळावे. यासाठी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका यासह सर्वच घटकांनी शासनाच्या आरोग्य योजनांचे दूत म्हणून आपली सेवा बजावावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

जेजे रुग्णालयात नुकत्याच झालेल्या अवयवदानाबद्दल डॉक्टर आणि स्टाफ यांचे कौतुक करीत जेजे रुग्णालयातील ११ कोटी ७४ लाख किमतीच्या कामांचे उद्‍घाटन आणि २०५ कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजनाप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. दोन वर्षांत जेजे रुग्णालयाचे शंभर १०० टक्के नूतनीकरण करून गरीब व गरजू रुग्णांना आधुनिक उपचार, सर्व सोयीसुविधा पुरवण्याचा आमचा मानस असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

जेजे रुग्णालयातील विविध विभागांचा उद्घाटन सोहळा व भूमिपूजन शुक्रवारी पार पडले. या सोहळ्याला विधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे, दिनेश वाघमारे, मुख्य सचिव वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली. या वेळी ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयात ईएनटी विभाग, औषध वैद्यकशास्त्र, अस्थिव्यंगोपचार कक्ष, फिजिओलॉजी लेक्चर हॉलचे उद्घाटन आणि महाविद्यालयात नव्याने बांधण्यात येणाऱ्या व नूतनीकरण करण्यात येणाऱ्या इमारतीच्या कामांचा समावेश आहे.

--------------------------
पीपीपी तत्त्वावर एमआरआय
नागपूर येथील नऊ शासकीय महाविद्यालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर एमआरआय, सीटीस्कॅन सेवा सुरू करण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
-----------------------
अवयवदानाचे महत्त्व पटवून द्या
या ठिकाणी सुरू असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अवयवदान चळवळीमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे असून, मेंदूमृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT