मुंबईत सार्वजनिक वाहतूक सुविधा अपुरी
लोकसंख्येच्या तुलनेत निम्म्याहून कमी बस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सार्वजनिक वाहतूक म्हणून बस ही महत्त्वाची प्रवासी सेवा आहे. राज्यातील कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तसेच शहराला गावासोबत जोडण्यासाठी बस ही एक महत्त्वाची सार्वजनिक व्यवस्था आहे. राज्यात २० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली अर्थात एक टियर आणि एक टियरमध्ये समावेश होणारी नऊ शहरे आहेत. मुंबईत सध्या तीन हजार ६०० बस धावत आहेत. केंद्राच्या निकषानुसार मुंबईसाठी आठ हजार बस आवश्यक आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी आहे.
सार्वजनिक वाहतुकीचा अभ्यास करणारी जागतिक संस्था ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन ॲण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी’च्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. मुंबईच नव्हे तर महानगर प्रदेश आणि राज्यातील उर्वरित शहरांत सार्वजनिक वाहतुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या बसगाड्यांची कमतरता आहे. या अहवालानुसार, राज्यात ५.४ कोटी शहरी भागातील नागरिकांच्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी राज्यातील ४४ शहरांत किमान २८ हजार ८०० बसगाड्यांची आवश्यकता आहे. सध्या राज्यात शहरी भागात केवळ आठ हजार ७०० बसचा ताफा आहे. यातही साडेतीन हजार बस आयुर्मान पूर्ण झाल्याने सेवेतून बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
------
१४ शहरांत प्रति लाख १५ बस
केंद्र सरकारच्या २०१२मध्ये सादर केलेल्या १२व्या पंचवार्षिक योजनेच्या शिफारशीनुसार, दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे आवश्यक आहे. यानुसार राज्यातील ४४ शहरांत ५.४ कोटी लोकसंख्या आहे. ३० शहरांतील नागरिक सार्वजनिक परिवहन सेवेपासून वंचित आहेत. १४ शहरांत प्रति लाख प्रवाशांमागे सरासरी केवळ १५ बस धावत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.