मुंबई

शहरात अवजड वाहतूक सुरूच

CD

शहरात अवजड वाहतूक सुरूच
सकाळी सात ते रात्री १२ पर्यंत प्रवेशबंदीचे उल्‍लंघन; वाहनचालकांसह प्रवासी त्रस्‍त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : निर्बंध लादूनही मुंबई शहरासह उपनगरांमध्ये अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू असल्‍याचे दिसते. त्‍यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून, वाहतूक विभागाने अशा वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवासी करीत आहेत.
मुंबई शहरामध्ये प्रत्‍येक दिवशी नवी वाहने दाखल होत आहेत. तसेच देशाची आर्थिक राजधानी असलेल्‍या या शहराची लोकसंख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्‍या प्रमाणात वाहतुकीचे नियोजन नसल्‍याने शहरातील सर्वच भागात वाहनांच्या रांगा लागलेल्‍या असतात. यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सकाळी सात ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी केली आहे. तरीही अवजड वाहने शहरात बंदीच्या काळात फिरताना दिसतात. नियमांचे उल्लंघन होऊनही त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. बंदीच्या काळात ओव्हरलोड वाहनांचीही वाहतूक सुरू असते. सकाळ, संध्याकाळ कोंडी होत असल्याने नोकरदारांना कार्यालय आणि घरी जाण्यास नेहमी उशीर होतो.
मुंबईत मेट्रोच्या कामांमुळे रस्ते अनेक ठिकाणी खोदले असल्याने वाहतुकीच्या मार्गिका कमी झाल्या आहेत. काही रस्ते एकदिशा मार्ग केले आहेत, तर काही ठिकाणची वाहतूक अन्य मार्गांवरून वळवली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यासाठी वेळापत्रक आखून दिले आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्यावेळी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच काही मार्गांवर प्रवेशबंदी आहे, मात्र तरी त्या मार्गावरून मालवाहतूक केली जाते.

काय आहे वाहतूक पोलिसांचा आदेश?
दक्षिण मुंबईत अवजड वाहनांना सकाळी सात ते रात्री १२ पर्यंत प्रवेशबंदी आहे. या वाहनांना रात्री एकनंतर सकाळी सातपर्यंत जाण्यास परवानगी आहे, तर दक्षिण मुंबई वगळता अन्य भागांत अवजड वाहनांना सकाळी सात ते ११ आणि सायंकाळी पाच ते १० या वेळेत प्रवेशावर निर्बंध आहेत. या आदेशातून आपत्कालीन वाहने आणि सरकारी वाहने, एसटी, बेस्ट, स्कूल बस, प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचारी बस, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांना यातून सूट देण्यात आली आहे.

मुंबईत अवजड वाहनांना वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केले जात असल्‍यास संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात येतील. तसेच कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल.
- एम. रामकुमार,
अपर पोलिस आयुक्त

पश्‍चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, फ्रीवे या रस्‍त्‍यांवर अवजड वाहतूक सुरू आहे. ही वाहने क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करतात. त्यामुळे रस्त्याचे नुकसान होत असून, अपघाताचा धोका आहे, मात्र त्याकडे वाहतूक पोलिसांचे आणि परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
प्रदीप वाघमारे,
अवजड वाहतूक विभागप्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT