पालघरमधील प्रस्तावित
प्रकल्प प्रदूषणमुक्त
रिलायन्स इंडस्ट्रीजचा दावा
मुंबई, ता. १६ : पालघर जिल्ह्यातील टोकराळे आणि माहीम गाव परिसरात रिलायन्स इंडस्ट्रीजचा पीटीए पावडर आणि पॉलिएस्टर धागा तयार करण्याचा प्रकल्प येणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे प्रदूषणमुक्त असून जलसंपत्ती, जमीन, वनसंपत्ती, बागा, मासेमारी, मिठागर, पर्यटनावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
पालघर जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणि एमआयडीसीच्या योजनेंतर्गत रिलायन्सने आणलेल्या प्रकल्पात पीटीए पावडर आणि पॉलिएस्टर धागा तयार केला जाणार आहे. या ठिकाणी कोणतेही रासायनिक द्रव्य तयार करण्यात येणार नाही की रंगांच्या साह्याने डाइंग किंवा प्रिंटिंग केले जाणार नाही. हा हरित प्रकल्प आहे, असेही रिलायन्सने म्हटले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण, जैवविविधता, पर्यटन आदींवर प्रतिकूल परिणाम होतील का, अशा शंका ग्रामस्थांनी व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे रिलायन्स कंपनीने केळवा-माहीम परिसरातील परिसंस्थेचा अभ्यास करून पर्यावरणाला कोणताही धोका न होता हरित प्रकल्पाच्या धर्तीवर या प्रकल्पाची रचना केली आहे.
----
स्थानिकांना नऊ हजार नोकऱ्या
प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पातून नऊ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार असून, लघू व्यवसायांच्याही मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन केले जाणार आहे. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा उभारली जाणार आहे. तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलही उभारले जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी वरदान ठरणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.