मुंबई

स्तनाच्या कर्करोगावर पहिल्यांदा रोबोटिक शस्त्रक्रिया

CD

स्तनाच्या कर्करोगावर पहिल्यांदाच रोबोटिक शस्त्रक्रिया
महाराष्ट्रातील पहिली नोंद; उपचार पद्धत बदलल्यामुळे रुग्णांना फायदा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : कर्करोगाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठीच कर्करोगाचे वेळेत निदान होऊन उपचार होणे गरजेचे असल्याने महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करत अपोलो कॅन्सर सेंटर येथे महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मॅसेक्टॉमीची पुनर्रचना ही टीलूपचा वापर करून शस्त्रक्रिया करण्यात आली.
भारतात स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक असून, विशेषत: एकूण रुग्णांपैकी ४८ टक्के रुग्ण या तरुण महिला असतात. कर्करोगविरोधी लढाईत उपचारांच्या पद्धती बदलत असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अत्याधुनिक उपचारांमुळे रुग्णाचा आयुष्याचा दर्जा सुधारत असतो. अशाप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानासह कर्करोगाचा शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मॅसेक्टॉमी (आरएनएसएम) टीलूपसह एकत्रित केल्याने इम्प्लान्टमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत.
--------------------------
कोणतीही बाधा नाही
या अत्याधुनिक प्रक्रियेमध्ये स्तनाजवळील त्वचा आणि निप्पल वाचविता येत असल्याने नैसर्गिक स्तनाचे स्वरूप व्यवस्थित राहते. स्तनावर कोणतेही व्रण दिसत नसल्याने सौंदर्याच्या दृष्टीनेदेखील फायदा होतो.
-----------------------------
पारंपरिक मॅसेक्टॉमीच्या तुलनेत मिनिमल इन्वेसिव म्हणजे कमीत कमी चिरफाडमुळे, लवकर बरे वाटते आणि त्रास कमी प्रमाणात होतो.
--------------------
प्रोफायलॅक्टिक मॅसेक्टॉमी
रोबोटिक प्रक्रिया ४३ वषीय ज्योती यांच्यावर करण्यात आली. त्यांना २०२४ मध्ये उजव्या स्तनाचा कर्करोगाचे निदान झाले. जनेटिक चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये बीआरसीए जीन पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले, ज्यामुळे त्यांच्या डाव्या स्तनालादेखील ७०-८० टक्के प्रमाणात कर्करोग होण्याचा धोका संभवत होता. सहा महिन्यांपूर्वी उजव्या स्तनाची ब्रेस्ट-कन्झर्विंग शस्त्रक्रिया झाल्यानंतर डाव्या स्तनाची प्रोफायलॅक्टिक मॅसेक्टॉमी करायची भीती वाटत होती, पण या प्रक्रियेमुळे मी कर्करोगावर मात केल्याचे ज्योती यांनी सांगितले.
-------------------------

अपोलो कॅन्सर सेंटरचे, मेडिकल ऑन्कोलॉस्ट पद्मश्री डॉ. सुरेश एच अडवानी म्हणाले, महाराष्ट्रात टीलूप रिकन्स्ट्रक्शन सह केलेली रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग प्रक्रिया ही फक्त तांत्रिक उपचार नसून यामुळे कर्करोगींना मानसिक मनोबल, चांगली उपचार पद्धती मिळाली असून, स्तनाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी उत्तम पर्याय मिळाला आहे.
....
ब्रेस्ट सर्जन डॉ. संदीप बिपटे यांनी सांगितले की, सर्व टीमच्या सहकार्यातून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. रोबोटिक सर्जरी केली जाते, पण राज्यात स्तनावर पहिल्यांदाच या प्रक्रियेचा वापर केला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT