सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : शहरात प्रदूषणाची डोकेदुखी कायम आहे. मुंबईतील अनेक भागात हवेची गुणवत्ता ढासळली आहे. देवनारमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली असून, येथील हवेचा स्तर वाईट नोंद झाली आहे. शुष्क वातावरण, त्यात हवेचा स्तर खराब झाल्याने चिंता वाढली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या प्रदूषणाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आज (ता. १९) दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील हवेचा स्तर ढासळला आहे. मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली असून, त्यासोबत प्रदूषणही वाढल्याने मुंबईकरांचे हाल वाढले आहेत.
देवनारमध्ये सर्वाधिक खराब हवेची नोंद झाली आहे. येथे २३२ हवा गुणवत्ता निर्देशांकासह वाईट हवेची नोंद झाली आहे. या परिसरातील हवेचा स्तर सातत्याने ढासळत आहे. येथील डम्पिंग ग्राउंडच्या दिशेने येणाऱ्या हवेमुळे या परिसरातील हवेची गुणवत्ता खराब होत असल्याचे दिसते. यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रदूषणाची मात्रा वाढली आहे. उच्चभ्रू सोसायट्या असणाऱ्या दक्षिण मुंबईतील अनेक परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे. काही परिसरातील उत्तम अथवा समाधानकारक हवेचा स्तर खालावला असून, येथे मध्यम हवेची नोंद झाली आहे. दक्षिण मुंबईत मध्यम हवेची नोंद झाली आहे.
पूर्व उपनगरात प्रदूषण वाढले
पूर्व उपनगरात प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली आहे. येथेदेखील मध्यम हवेची नोंद झाली आहे.
पश्चिम उपनगरात मध्यम हवेची नोंद
पश्चिम उपनगरात मध्यम हवेची नोंद झाली आहे. मुंबईत केवळ मुलुंड पश्चिम येथे ९२ हवा गुणवत्ता निर्देशांकासह समाधानकारक हवेची नोंद झाली आहे.
दक्षिण मुंबई
परिसर एक्यूआय
माझगाव १३४
वरळी ११८
कुलाबा १२७
भायखळा १११
सीएसएमटी १०१
पूर्व उपनगर
परिसरत एक्यूआय
शिवाजीनगर १५९
कुर्ला १२४
शिवडी १२२
घाटकोपर १२१
चेंबूर १२०
पश्चिम उपनगर
परिसर एक्यूआय
मालाड १५४
बोरिवली १४२
बीकेसी १३३
पवई ११२
मालाड १११
कांदिवली १०९
प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. चांगल्या पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रशासनाने विश्वासात घ्यायला हवे. सरकारच्या पर्यावरण कृती कार्यक्रमाचे काय झाले, हे ही तपासून घ्यावे लागेल. सरकार प्रदूषणमुक्तीसाठी फार आग्रही असल्याचे दिसत नाही.
- भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन
सर्वाधिक प्रदूषण हे बांधकामांमुळे होत आहे, हे महापालिका प्रशासनानेही वेळोवेळी मान्य केले आहे. मग अशा बांधकामांवर ठोस कारवाई का होत नाही?
- डी. स्टॅलिन, संस्थापक, वनशक्ती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.