मुंबई

निर्देशांकात अल्प प्रमाणात घसरण

CD

निर्देशांकात अल्प प्रमाणात घसरण
जागतिक अनिश्चित आर्थिक परिस्थितीचा परिणाम


मुंबई, ता. १९ : जागतिक अनिश्चित आर्थिक परिस्थितीमुळे बुधवारी (ता. १९) आशियाई शेअर बाजारांप्रमाणे भारतीय शेअर बाजारातही अल्प प्रमाणात घसरण झाली. सेन्सेक्स २८.२१ अंश, तर निफ्टी १२.४० अंश घसरला.

दिवसअखेर सेन्सेक्स ७५,९३९.१८ अंशांवर, तर निफ्टी २२,९३२.९० अंशावर स्थिरावला. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप हे निर्देशांकदेखील दीड ते अडीच टक्के वाढले, तर आयटी निर्देशांक सव्वा टक्के घसरला आणि फार्मा निर्देशांक पाऊण टक्के घसरला, तर दुसरीकडे प्रसारमाध्यमे, ऊर्जानिर्मिती, धातूनिर्मिती, सरकारी बँका, बांधकाम व्यवसाय, कॅपिटल गुड्स ही क्षेत्रे एक ते दोन टक्के वाढली. अमेरिकी धोरणामुळे लुपिन, डॉक्टर रेड्डीज लॅब, टीसीएस, इन्फोसिस हे शेअर घसरले, तर संरक्षण कंपन्यांच्या परवाना देण्यात सूसूत्रता आणली जाईल, तसेच एफडीआय धोरण शिथिल केले जाईल, या सरकारी हमीमुळे संरक्षण क्षेत्राच्या शेअरकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे माझगाव डॉकसारखे शेअर वाढले. तेल कंपन्यांना घरगुती एलपीजीच्या विक्रीतील तोट्यासाठी एकरकमी सबसिडी देणार या वृत्तामुळे त्यांच्या शेअरचीही खरेदी झाली. युक्रेन युद्ध तसेच व्यापार युद्ध यासंदर्भात अमेरिका व रशिया यांची बैठक सुरू झाल्यामुळे चांगले परिणाम शक्य आहेत, असे सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले.

सेन्सेक्समधील झोमॅटो पाच टक्के वाढला, ॲक्सिस बँक व आयसीआयसीआय बँक दीड टक्क्याहून जास्त वाढले. इंडसइंड बँक, कोटक बँक, टाटा स्टील एक टक्का वाढले, तर दुसरीकडे टीसीएस, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर लिव्हर या शेअरचे भाव दोन टक्क्यांच्या आसपास घसरले. सन फार्मा, एअरटेल, महिंद्र आणि महिंद्र, टेक महिंद्र, एचसीएल टेक या शेअरचे भाव एक टक्का घसरले.

...
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे परिणाम
वाहननिर्मिती, सेमी कंडक्टर भाग आणि औषधे यांच्या आयातीवर एप्रिलपासून २५ टक्के आयात कर आकारण्याचे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यामुळे बुधवारी (ता. १९) सर्वच शेअर बाजारांमध्ये नरम-गरम वातावरण होते. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर आणि जागतिक बाजारपेठांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वत्र निराशेचे वातावरण होते. त्यामुळे निर्यातप्रवण आयटी, औषधनिर्मिती ही क्षेत्रे घसरली.

परदेशी वित्त संस्थांची खरेदी सुरू झाल्यामुळे बाजारात आलेला उत्साह किती टिकेल, हे अनिश्चित आहे, अमेरिकी आयात कर आणि व्याजदर कपात अनिश्चित असली; तरी तिसऱ्या तिमाहीच्या निकालांबाबत सर्वजण आशावादी आहेत. त्यातच सरकारी खर्च वाढेल, हीदेखील अपेक्षा आहे. सध्या लार्ज कॅप शेअर्सचे मूल्यांकन आकर्षक आहे.
- विनोद नायर, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT