मुंबई

राहुल गांधी यांच्यावर दरेकरांची टीका

CD

राहुल गांधी यांच्यावर दरेकरांची टीका
मुंबई, ता. १९ : शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली वाहणारे राहुल गांधी हा मूर्ख माणूस असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांना किती आस्था आणि गंभीरता आहे हे यावरून दिसून येते, अशी टीका भाजपचे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केली.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा काही औपचारिकता पाळण्याचा विषय नाही. एक्सवरील पोस्ट करताना राहुल गांधी कुठल्या नशेत होते का, त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे श्रद्धा, दैवत आहेत. त्यांना जयंतीनिमित्ताने श्रद्धांजलीचे ट्विट करणार असाल तर काँग्रेसला शिवभक्त व शिवप्रेमी मुळासकट उखडून महाराष्ट्रात श्रद्धांजली अर्पित केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही दरेकरांनी दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर दरेकर म्हणाले, की सपकाळ यांनी आपल्या पक्षात जोडाजोडी करावी. मग भाजपच्या फोडाफोडीविषयी बोलावे. तुमचा पक्षच एवढा फुटलेला आहे. आपापसात गटतट आहेत त्यांना जोडण्याचे काम नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांनी करावे. काँग्रेसला वाचविण्यासाठी तुम्ही काम करण्याची गरज आहे. केवळ वक्तव्याने काँग्रेस उभारी घेऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT