मुंबई

महिलांसाठी कॅन्सरची लस वर्षभरात उपलब्ध होणार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा

CD

पाच-सहा महिन्यांत
कर्करोगावरील लस
आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, विशेषतः महिलांमध्ये त्याचे प्रमाण लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर महिलांमधील कर्करोगाला आळा घालणारी लस येत्या पाच-सहा महिन्यांत उपलब्ध होईल. ही लस नऊ ते १६ वयोगटातील मुलींना दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
कर्करोगाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. त्यानुसार ३० वर्षांवरील महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी डे केअर कॅन्सर सेंटर तयार केले जाणार आहेत. तसेच कर्करोग प्रतिबंधासाठी लस उपलब्ध केली जाणार आहे. लशीच्या संशोधनाचे काम पूर्ण झाले असून, सध्या चाचण्या सुरू आहेत. पुढील पाच ते सहा महिन्यांत ही लस उपलब्ध होईल. नऊ ते १६ वयोगटातील मुली या लशीसाठी पात्र असतील, अशी माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नेक्सो सेंटर ड्रग्स पार्टी प्रकरण; आनंद पटेल कल्याणहून अटकेत

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT