मुंबई

न्यू इंडिया बँकप्रकरणी सीएला समन्स

CD

न्यू इंडिया बँकप्रकरणी
सीएला समन्स
मुंबई, ता. १९ : न्यू इंडिया बँकेत सर्व आलबेल असल्याचा लेखापरीक्षण अहवाल देणाऱ्या सनदी लेखापाल अभिजित देशमुख याला आर्थिक गुन्हे शाखेने सामना जारी करून गुरुवारी चौकशीस बोलावले आहे. रिझर्व्ह बँक नियुक्त प्रशासकाच्या सहाय्यासाठी नेमलेल्या सल्लागार समितीत देशमुख याचा सहभाग असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २०१९-२०, २०२०-२१ या आर्थिक वर्षांचे बँकेचे लेखापरीक्षण देशमुखने केले होते. तसेच त्याने ‘ए ग्रेड’ प्रमाणपत्रही दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे लेखापरीक्षण करण्यासाठी कोणत्या नोंदींचा आधार घेण्यात आला. याबाबत त्याच्याकडे चौकशी केली जाणार आहे. यासोबत आर्थिक गुन्हे शाखा रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवणार आहे. २०२१ पासून न्यू इंडिया बँकेच्या कारभारावर देखरेख ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँकेला हा अपहार कसा दिसला नाही, हे जाणून घेतले जाणार आहे, असे अन्य एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
----
मेहता, पौन यांच्यात जुने व्यवहार
न्यू इंडिया बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन यांच्यातील जुने व्यवहार उघड झाले आहेत. पौन याचे जुने घर मेहता याने विकत घेतले होते. पौन याला कर्ज मिळवून देण्यासाठी मेहता याने प्रयत्न केले होते, अशी माहिती पुढे येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात लाच घेताना महसूल सहाय्यक अधिकारी रंगेहात पकडला

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT