मुंबई

मार्च-एप्रिल पर्यंत शेअर बाजार स्थिर होणार!

CD

मार्च-एप्रिलपर्यंत शेअर बाजार स्थिर होणार!
प्रभुदास लीलाधर वित्त संस्थेचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : येत्या एक-दोन महिन्यांत शेअर बाजारात चढउतार होतच राहतील, मात्र या आर्थिक वर्षाच्या अखेरीस शेअर बाजार स्थिर होतील, असा अंदाज प्रभुदास लीलाधर कॅपिटल या वित्तसेवा संस्थेने व्यक्त केला आहे. लवकरच सरकारी भांडवली खर्च वाढण्याची अपेक्षा असून, करकपातीचे फायदेही ग्राहकांना मिळाल्याने त्यांची मागणी वाढेल. अशा स्थितीत परदेशी गुंतवणूकदार पुन्हा भारतात येण्याची शक्यता असल्याचे संस्थेने म्हटले आहे. येत्या वर्षभरात निफ्टी २५ हजार ६८९ अंशांच्या आसपास असेल, असेही त्यांनी आपल्या स्ट्रॅटेजी रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
अमेरिकी आयात करवाढीचा भारतावर फारसा वाईट परिणाम होणार नाही. कारण कच्च्या तेलाच्या घटत्या किमती, रशिया-युक्रेन युद्ध थांबल्यास येणारे भूराजकीय स्थैर्य आणि भारताकडे होणारे तंत्रज्ञान हस्तांतरण यामुळे अमेरिकी आयात करातील वाढीमुळे होणारे नुकसान भरून निघेल, असेही संस्थेचे म्हणणे आहे. संस्थेने बँका तसेच आरोग्य या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे.

शेअर बाजारात होणार तेजी
‘शेअर बाजार पुन्हा तेजी कधी दाखवतील’ या विषयावरील अहवालात संस्थेने म्हटले आहे, की देशांतर्गत मागणी आता वाढण्याच्या बेतात आहे. ऑक्टोबर महिन्यात अन्नधान्य चलनवाढ ११ टक्क्यांच्या जवळपास होती. ती आता सहा टक्क्यांपर्यंत घसरली आहे. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर कपातीमुळे येत्या तीन ते सहा महिन्यांत रोकड सुलभता येईल. सर्व करदात्यांना मिळून आयकारातून एक लाख कोटी रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. तसेच धार्मिक पर्यटनातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. सरकारचा भांडवली खर्च १७ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. या सर्व बाबींमुळे तेजीला बळ मिळेल, असे संस्थेचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT