मराठी भाषा गौरव सोहळा
आज गेटवे ऑफ इंडिया येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रम
मुंबई, ता. २६ : मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या (ता. २७) मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीप्रीत्यर्थ आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसद तसेच दोन्ही सभागृहांतील सदस्यही उपस्थित असणार आहेत. मराठी भाषा विभागांतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झाला आहे. नामवंत प्रकाशन संस्थेसाठी २०२४चा श्री. पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशनला जाहीर झाला आहे. डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ. रमेश सीताराम सूर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे.
याशिवाय ग्रामीण साहित्यासाठी २०२३चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ते या वेळी प्रदान केले जाणार आहेत.
...
इतर पुरस्कार
बालकवी पुरस्कार, भा. रा. भागवत पुरस्कार, साने गुरुजी पुरस्कार, राजा मंगळवेढेकर पुरस्कार, यदुनाथ थत्ते पुरस्कार, ना. धो. ताम्हनकर पुरस्कार, बहिणाबाई चौधरी पुरस्कार, विजय तेंडुलकर पुरस्कार, श्री. ना. पेंडसे पुरस्कार, ग. ल. ठोकळ पुरस्कार, ताराबाई शिंदे पुरस्कार, सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार ज्यांना जाहीर झाले आहेत, त्यांना हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
...
अन्य पुरस्कार विजेते असे
एकनाथ पाटील, मकरंद साठे, आनंद विंगकर, दिलीप नाईक-निंबाळकर, अंजली जोशी, शेखर गायकवाड, विवेक गोविलकर, डॉ. वसंत भा. राठोड, समीर चव्हाण, प्रकाश पवार यांच्यासह उज्ज्वला जोगळेकर, सुबोध जावडेकर, डॉ. ललिता विजय बोरा, सुनीता सावरकर, या. रा. जाधव, हेमंत चोपडे, माधव गाडगीळ, रविमुकुल, श्रीकांत अरुण पाठक आणि सुप्रिया राज यांनाही जाहीर झालेले पुरस्कार देण्यात येणार आहेत.
...
यशवंत नाट्य मंदिरात ‘अमृतातेही पैजा जिंके’
मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत महाराष्ट्र मित्रमंडळ, मुंबई प्रस्तुत ‘अमृतातेही पैजा जिंके’ हा मराठी भाषेची बहुआयामी महती मांडणारा काव्य, नाट्य, गीतयुक्त अभिमान सोहळा उद्या (ता. २७) सायंकाळी ६:३० माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली. ‘अमृतातेही पैजा जिंके’ या कार्यक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांची गाणी ऐकायला मिळतील. या वेळी काव्य व अभिवाचन मधुरा वेलणकर, पुष्कर श्रोत्री करणार आहेत. यासोबत या कार्यक्रमात गायक कलाकार म्हणून धनंजय म्हसकर, अर्चना गोरे, मंदार आपटे, माधुरी करमरकर आणि हृषिकेश रानडे आदींचा सहभाग असेल. गीत रामायणावरील विशेष नृत्य पूजा पंत व शिष्यांगना सादर करतील, अशी माहितीही संचालक चवरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.