भंगारात काढलेल्या १५ हजार गाड्यांची विक्री
दोन हजार वाहनांचा लिलाव बाकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : पंधरा वर्षांहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या ताफ्यातील आणि परिवहन मंडळातील पंधरा वर्षांपूर्वीची १५,७४७ वाहने भंगारात काढण्यासाठी पाठविण्यात आली होती. या वाहनांचा लिलाव झाला आहे, तर आणखी १,२९४ वाहनांचा लिलाव होणार आहे.
केंद्र सरकाने जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे, रस्त्यावरील प्रवासी तसेच अन्य वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ करणे, वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे आणि वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे, यासाठी १५ वर्षांवरील जुनी सरकारी वाहने मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने राज्यातही पावले उचलली जात आहेत. यामध्ये सरकारी वाहनांसह एसटी महामंडळातील काही गाड्यांचादेखील समावेश आहे. राज्यातील वाहने भंगारात काढली आहेत. केंद्र सरकारच्या स्टील मंत्रालयांतर्गतच्या एमएसटीसीच्या संकेतस्थळावर ही वाहने ठेवण्यात आली होती. त्यातील काही वाहनांची विक्री झाली, तर उर्वरित वाहनविक्रीला प्रतिसाद मिळाला नव्हता. काही वाहनांच्या लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने लिलावाच्या रकमेत १० टक्के कपात करण्यात आली होती; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भंगार वाहनांची डिलिव्हरी न मिळाल्याने उर्वरित वाहनांची प्रक्रिया रखडली होती. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना गाड्यांची माहिती आरटीओ विभागाला द्यावी लागत होती. त्यानंतर आरटीओ विभागाकडून पुढे प्रक्रिया एमएसटीसीकडून केली जात होती. लिलाव झाल्यानंतर एमएसटीसीकडून लिलावाची रक्कम आरटीओकडे पाठवली जात होती. वाहनांची डिलिव्हरी झाल्यानंतर संबंधित स्वराज्य संस्थेला ती रक्कम वर्ग केली जात होती; परंतु आता लॉगिन मिळाल्याने थेट व्यवहार करता येत आहेत.
...
भंगार वाहनविक्री
२०२४ पूर्वी - ७,६९५
२०२४-२५ - ८,०५२
एकूण - १५, ७४७
लिलाव बाकी असलेली वाहने - १,२९४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.