स्वारगेट अत्याचारप्रकरणी
विभागीय चौकशीचे आदेश
दोषींच्या तत्काळ निलंबनाचे परिवहनमंत्र्यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : स्वारगेट एसटी बस स्थानकात मंगळवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या बस स्थानकाचे प्रमुख सहाय्यक वाहतूक अधीक्षक आणि आगार व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशीचे आदेश देतानाच दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत.
स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार झालेल्या महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. परिवहनमंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीबरोबरच सर्व सुरक्षा रक्षकांना तत्काळ बदलून सुरक्षा मंडळामार्फत नव्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशा सूचनाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार यांना दिल्या आहेत. सध्या महिला सन्मान योजनेंतर्गत प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत दिली जात असल्याने महिलांची प्रवासी संख्या वाढली आहे. स्वारगेट स्थानकातील घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
------
मंत्रालयात तातडीची बैठक
या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (ता. २७) महिला सुरक्षेसंदर्भात एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलावली आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील ही बैठक सकाळी साडेबारा वाजता बोलावण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.