सेबीसह ओबीपीपीचा बॉण्ड सेंट्रल उपक्रम
कॉर्पोरेट रोखे बाजारात सुलभता आणि पारदर्शकता येणार
मुंबई, ता. ४ : सेबी, एनएसई, बीएसई, एनएसडीएल, सीडीएसएल यांच्या सहकार्याने ऑनलाइन बॉण्ड प्लॅटफॉर्म प्रोव्हायडर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे गुंतवणूकदारांसाठी ‘बॉण्ड सेंट्रल’ या उपक्रमाची सुरुवात मंगळवारी (ता. ४) करण्यात आली. भारताच्या कॉर्पोरेट रोखे बाजारामध्ये सुलभता आणि पारदर्शकता आणणे, तसेच छोट्या गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवून बदल घडवणे, हे यामागील हेतू आहेत.
ओबीपीपी प्लॅटफॉर्मचे काम सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षभरात कॉर्पोरेट रोखे आणि एसडीआयमधील मासिक व्यवहारांमध्ये ३२७ टक्के वाढ झाल्याची माहिती बीएसईच्या संकेतस्थळावर नोंदवली आहे. या बॉण्ड सेंट्रलमुळे कॉर्पोरेट रोखे बाजाराच्या माहितीमधील तफावत दूर होईल आणि गुंतवणूकदार रोखे बाजाराकडे आकर्षित होतील. तसेच शैक्षणिक संसाधनांच्या उपलब्धतेमुळे ते सक्षम होतील, हे ही त्याचे प्रमुख हेतू आहेत.
गुंतवणूकदार निर्णय घेण्यास होणार सक्षम
भारतातील कॉर्पोरेट रोखे बाजाराची व्यापकता वाढवणे आणि छोट्या गुंतवणूकदारांना स्थिर गुंतवणूक पर्याय देणे, यासाठी सेबीने सुरू केलेल्या प्रयत्नांशी हा उपक्रम सुसंगत आहे. यातून गुंतवणूकदारांना रोख्यांची व्यापक सूची मिळेल. त्यातून गुंतवणूकदारांना माहिती मिळून तुलनाही करता येईल. तसेच गुंतवणूकदार रोख्यांच्या किमतीची तुलना सरकारी सिक्युरिटी आणि इतर निश्चित उत्पन्न साधनांशी करू शकतील. त्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेता येईल, असे ओबीपीपी असोसिएशनच्या अध्यक्ष आदिती मित्तल म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.