मुंबई

''निफ्टी''ची दहावी घसरण

CD

‘निफ्टी’ची दहावी घसरण
सेन्सेक्स ९६ अंश घसरला
मुंबई, ता. ४ : अमेरिकी आयात करवाढीच्या भीतीमुळे मंगळवारी (ता. ४) जागतिक शेअर बाजारांप्रमाणे भारतीय शेअर बाजारातही निराशा होती. त्यामुळे सेन्सेक्स तिसऱ्या दिवशी ९६.०१ अंश घसरला. तर निफ्टी सलग दहाव्या दिवशी ३६.६५ अंश घसरला. अमेरिकेच्या नव्या आयातकराची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये संथ वातावरण होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजार मंगळवारी तोटा दाखवत उघडले होते. नंतर त्यांच्यात तळाच्या भावाला खरेदी झाली व सेन्सेक्सने ७३ हजारांच्या वरही मजल मारली; मात्र तेथे तो टिकू शकला नाही व दिवसअखेर सेन्सेक्स ७२,९८९.९३ अंशावर तर निफ्टी २२,०८२.६५ अंशावर स्थिरावला.

बँका, कॅपिटल गुड्स, ऑइल अँड गॅस, सरकारी बँका ही क्षेत्रे वाढली. तर वाहननिर्मिती, आयटी, दूरसंचार, एफएमसीजी ही क्षेत्रे एक टक्क्याच्या आसपास घसरली. ओपेकतर्फे कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याची घोषणा केल्यामुळे कच्च्या तेलाचे भाव घसरले. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअरकडे सर्वांचे लक्ष गेले. तर युरोपातील संरक्षण क्षेत्राचे शेअर वाढल्यामुळे भारतातही या क्षेत्राच्या शेअरमध्ये खरेदी झाली. अमेरिकेच्या करवाढीमुळे औषधनिर्मिती तसेच आयटी शेअर चार टक्क्यांपर्यंत घसरले.

सेन्सेक्समध्ये मंगळवारी बजाज फिन्सर्व, एचसीएल टेक दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. नेसले, एशियन पेंट दीड टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. मारुती, एअरटेल, सन फार्मा, इन्फोसिस, टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअर्सचे भाव एक टक्का घसरले. तर स्टेट बँक तीन टक्के, झोमॅटो अडीच टक्के वाढला. टीसीएस एक टक्का वाढला आणि अदाणी पोर्ट, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो अर्धा टक्का वाढले.

कोट
........
तळाच्या भावाला खरेदी झाल्यामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरचे भाव वाढले. त्यांची खरेदी सतत होत राहिली तर शेअर बाजाराला आधार मिळू शकेल.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT