मुंबई

युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाची बाजी

CD

युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाची बाजी
नोएडा येथील कार्यक्रमात सुवर्णपदकासह ८६ गुणांची कमाई
मुंबई, ता. ९ बातमीदार ः ३८ व्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आठ सुवर्णपदके, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकांची कमाई करत मुंबई विद्यापीठास उपविजेतेपदाचा बहुमान मिळाला आहे. या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने एकूण ८६ गुणांची कमाई केली आहे. भारतीय विद्यापीठे संघ (एआययु) यांच्या निर्देशानुसार ३ ते ७ मार्च २०२५ यादरम्यान अमिटी विद्यापीठ, नोएडा येथे या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात देशातील १४८ विद्यापीठे सहभागी झाली होती.
संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य आणि ललितकला या पाच विभागांत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाने संगीत विभागातून भारतीय सुगम संगीत गायन, भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय तालवाद्य, पाश्चिमात्य वाद्य एकल वादन या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले, तर पाश्चिमात्य समूह गायन व पाश्चिमात्य एकल गायन या स्पर्धांमध्ये रौप्यपदक आणि भारतीय समूह गायन स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले आहे. नाट्य विभागातील प्रहसन स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. साहित्य विभागातील वादविवाद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच ललित कला विभागातील झालेल्या स्पर्धांमध्ये रांगोळी आणि व्यंगचित्र स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. विशेष म्हणजे सहभागी १४८ विद्यापीठांनी सादर केलेल्या शोभा यात्रा स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठास सुवर्णपदकाचा बहुमान मिळाला आहे. संगीत या विभागामध्ये सर्वात जास्त गुणांची कमाई करून मुंबई विद्यापीठाने संगीत विभागातील अंतिम सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या चमूने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचे यशस्वी नियोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे यांनी केले.
.........
प्राथमिक फेरीतही उत्‍कृष्ट कामगिरी
हा राष्ट्रीय महोत्सव दोन फेऱ्यांमध्ये आयोजित केला जातो. स्पर्धेची प्राथमिक फेरी संपूर्ण देशात सात क्षेत्रीय विभागात आयोजित केली जाते. या प्रत्येक क्षेत्रीय विभागातील प्रत्येक स्पर्धेच्या प्रथम, द्वीतीय आणि तृतीय पारितोषिक विजेत्यांना अंतिम फेरीत सहभागी होता येते. ४ ते ८ जानेवारीदरम्यान गणपत विद्यापीठ, महेसाना, गुजरात येथे आयोजित केलेल्या प्राथमिक फेरीमध्ये पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठास १२ पदकांची कमाई करत या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT