मुंबई

ॲड. प्रदीप घरत यांची नियुक्ती रद्द

CD

ॲड. प्रदीप घरत यांची नियुक्ती रद्द
बहुचर्चित पायल तडवी आत्महत्याप्रकरणी नवा आदेश


मुंबई, ता. ९ : बहुचर्चित पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या खटल्यात न्याय व विधी विभागाने ॲड. महेश मुळ्ये यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे, तसे आदेश विभागाने शुक्रवारी (ता. ७) जारी केले. या आधी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रदीप घरत हे विशेष सरकारी वकील म्हणून या खटल्याचे कामकाज पाहत होते. विधी व न्याय विभागाने जारी केलेल्या आदेशात ॲड. घरत यांची नियुक्ती रद्द केल्याचे नमूद केले.

नायर रुग्णालयाच्या टोपीवाला महाविद्यालयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टर पायलने (वय २६) २२ मे २०१९ रोजी रुग्णालय आवारातील वसतिगृहात आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी महाविद्यालयात पुढील वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या भक्ती मेहरे, पायल खंडेलवाल आणि हेमा आहुजा या तीन निवासी डॉक्टरांना पायलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात अटक केली. तपासादरम्यान आरोपींनी पायलचा मानसिक छळ केल्याची माहिती उघड झाली; यात जातीवाचक शेरे, टोमणे आदींचा समावेश होता. पुढे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. घरत यांची नियुक्ती करण्यात आली होती. याच आठवड्यात महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या तत्कालीन प्रमुख डॉ. ली यिंग चियांग यांना आरोपी करण्याबाबतचा अर्ज ॲड. घरत यांनी न्यायालयात सादर केला, तो न्यायालयाने मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT