वाहतूक विभागातील वाहने अनफिट
नवीन गाड्यांचे वाटप रखडले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : वाहतूक पोलिस विभागातील बहुतांशी गाड्या अनफिट आहेत. परिणामी, गाड्या अनेकवेळा रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. गाड्या बंद पडत असल्याने वाहतूक पोलिस हैराण झाले आहेत; मात्र वाहतूक विभाग मुख्यालयात नवीन गाड्या आल्या आहेत, अद्याप त्याचे वाटप रखडल्याने बहुतांशी नादुरुस्त गाड्या रस्त्यावर कार्यरत आहेत.
रस्ता सुरक्षितेत वाहतूक पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे; परंतु वाहतूक पोलिस विभागातील बहुतांशी गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. परिणामी, गाड्यांमध्ये सातत्याने बिघाड होत असून या गाड्या अनेकवेळा रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. अनफिट गाड्यांमुळे अपघात होण्याची भीतीही आहे. वाहतूक विभागातील वाहनेही आठ वर्षे जुनी आहेत; परंतु या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे, त्यामुळे ही वाहने योग्यरितीने काम करीत नाहीत. आठवड्यात दोन ते तीन वेळा ही वाहने दुरुस्तीसाठी पाठवावी लागतात. काही वेळा ही वाहने वाहतूक कोंडीत भर रस्त्यातच बंद पडतात. सातत्याने वाहनात बिघाड होत असल्याने घटनास्थळी पोलिसांना वेळेवर पोहोचता येत नाही. याशिवाय इतर वाहनांसाठी शोधाशोध करावी लागते. त्यात या जुन्या वाहनांच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. एखादी गाडी जास्तीत जास्त तीन लाख किमीपर्यंत चालायला हवी; परंतु त्यापेक्षा जास्त गाडी चालल्यास बिघाड होतो; तसेच अपघाताचाही धोका असतो, असे एका परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
..
सामान्य वाहनचालक असो किंवा अधिकारी सर्वांसाठी वाहनांची फिटनेस महत्त्वाची आहे. वाहतूक पोलिसांना चांगली सेवा देता यावी, यासाठी गाड्या फिट असायला हव्यात.
- अजय गोवले, वाहतूक अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.