एअर इंडियाचे विमान बॉम्बने
उडवून देण्याची धमकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सोमवारी (ता. १०) मोठी खळबळ उडाली. हे विमान तातडीने मुंबई विमानतळावर पुन्हा उतरवण्यात आले. या विमानात ३२२ प्रवासी आणि १९ क्रू सदस्य होते. या वेळी सुरक्षा यंत्रणांकडून विमानाची कसून तपासणी करण्यात आली.
एआय-११९ या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर शौचालयात संशयास्पद चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत विमान बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विमान तातडीने मुंबईत परत बोलावण्यात आले. विमानाने सकाळी १०.२५ वाजता सुरक्षित लँडिंग केले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विमानाच्या प्रत्येक भागाची कसून तपासणी सुरू केली. या घटनेमुळे प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशांची मुंबईतील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हे विमान ११ मार्चला पहाटे ५ वाजता न्यूयॉर्कसाठी उड्डाण करणार असल्याची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.