रासायनिक उद्योग एक लाख कोटी डॉलरच्या पुढे जाणार
मुंबई, ता. १० : भारतीय रासायनिक उद्योगाचा विस्तार २०२४ पर्यंत एक लाख कोटी डॉलरच्या पुढे जाऊन नवसंशोधनाद्वारे चीनला मोठ्या प्रमाणात स्पर्धा करेल, अशी खात्री ‘आयसीसी’च्या अठराव्या वार्षिक परिषदेत व्यक्त करण्यात आली.
भारतीय रासायनिक उद्योगाची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था इंडियन केमिकल कौन्सिलच्या परिषदेत धोरणकर्ते, या क्षेत्रातील लहान मोठे उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. सध्या भारतीय रासायनिक उद्योग क्षेत्राचा व्याप २२० अब्ज डॉलर आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. देशांतर्गत वाढता व्यापार, बदलत्या पुरवठा साखळ्या आणि कमी होत असलेल्या खर्चामुळे हे क्षेत्र वाढीसाठी सज्ज आहे. सरकारी पाठिंबा आणि तांत्रिक प्रगतीमुळे ही गती आणखी वाढेल, असे आयसीसीचे अध्यक्ष कार्तिक भरतराम यांनी सांगितले, तर आता या क्षेत्रातील एक हजार उद्योग पन्नास संशोधन संस्थांशी जोडत असल्यामुळे उद्योग-शैक्षणिक सहकार्याला चालना मिळेल, असे केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाच्या सचिव निवेदिता शुक्ला-वर्मा म्हणाल्या. भारताच्या निर्यातीत रासायनिक निर्यातीचा वाटा सात टक्के असून, गेल्या वर्षीची निर्यात ४५ अब्ज डॉलर होती, असे पेट्रोकेमिकल्स विभागातील रसायन विभागाचे सहसचिव दीपंकर आरोन म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.