मुंबई

मोबाईल, मेसेज, लाइफ पार्टनरमुळे ४९ टक्‍के मुंबईकरांची निद्रानाश

CD

मोबाईल, मेसेज, लाइफ पार्टनरमुळे ४९ टक्‍के मुंबईकरांचा निद्रानाश
सहा तासांपेक्षाही मिळते कमी झोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मोबाईल, मेसेज आणि लाइफ पार्टनरमुळे ४९ टक्‍के मुंबईकरांचा रात्री निद्रानाश होत असून, ते सहा तासांपेक्षा कमी झोपतात.  ४९ टक्‍के मुंबईकरांना मोबाईलवरील मेसेज आणि आयुष्यातील जोडीदारामुळे रात्री कमी झोप मिळते.  मात्र चांगल्या आरोग्यासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे.
महानगरात केवळ ४२ टक्के लोक आहेत, ज्यांना सहा ते आठ तासांची झोप मिळते. ‘लोकल सर्कल’ संस्थेच्या सर्व्हेमध्ये ही बाब पुढे आली आहे. शुक्रवारी (ता. १४) होणाऱ्या जागतिक झोप दिवसानिमित्त या खासगी संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे.
योग्य अंथरुण नसणे, घरातील कामाचा ताण, स्लीप एपनिया (आजार) आणि लहान मुलांनाही कमी झोपेसाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्यावर परिणाम होऊन अनेक आजारांना आमंत्रण मिळते. चिडचिड आणि मानसिक आजाराला बळी पडण्याची शक्यता आहे. अंगदुखी, जडपणा, थकवा यासारख्या समस्या उद्‌भवतात. पचनावरही परिणाम होतो. त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती दोन्ही कमकुवत होण्याची शक्यता असते. झोपेच्या कमतरतेमुळे डोके जड होण्याची समस्या कायम राहते. कमी झोपणाऱ्या लोकांना वजन वाढण्याची समस्यादेखील भेडसावते.

फक्त ४२ टक्‍के लोक सहा ते आठ तास झोपतात
मुंबईतील ५ हजार ५७२ लोकांचे मत जाणून घेण्यात आले. ‘लोकल सर्कल’चे संस्थापक सचिन तापडिया यांनी सांगितले की, मुंबईसह देशातील ३४८ जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर ४३ हजार लोक सहभागी झाले होते. यामध्ये ५ हजार ५७२ मुंबईकरांचाही समावेश आहे. गेल्या १२ महिन्यांत रात्री किती तासांची अखंड झोप घेतली, झोपेचा त्रास होण्याचे कारण काय, पुरेशी झोप घेण्यासाठी तुम्ही काय करता असे प्रश्‍न सर्वेक्षणात सहभागी लोकांना विचारण्यात आले.

दोन टक्‍के लोक आठ ते १० तास झोपतात
सर्वेक्षणातील सात टक्के सहभागी झालेल्‍या लोकांनी सांगितले, की ते फक्त चार तास झोपतात. दोन टक्के सहभागींनी सांगितले, की ते आठ ते १० तास झोपतात. तर ४२ टक्के लोकांनी ते सहा ते आठ तास झोपतात, असे सांगितले.

डास, बाहेरील आवाजही कारणीभूत
१९ टक्‍के मुंबईकरांनी सांगितले की, मोबाईलवरील मेसेजमुळे त्यांची झोप भंग पावते. ४४ टक्‍के लोकांनी सांगितले की एक किंवा अधिक वेळा शौचालयात गेल्याने त्यांची झोप भंग पावते. याशिवाय १२ टक्के लोकांनी कमी झोपेसाठी डास किंवा बाहेरून येणारा आवाज यांना जबाबदार धरले.

आठवड्याच्या शेवटी झोपेचा कोटा पूर्ण करतात
सर्वेक्षण केलेल्या २० टक्‍के सहभागींनी सांगितले, की ते शनिवार व रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी खूप झोपतात. तसेच ३४ सहभागींनी झोपेची भरपाई होत नाही, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपवर गंभीर आरोप

MI vs PBKS Live: खतरनाक थ्रो! श्रेयस अय्यरने 'चेंडू' वेगाने फेकला, पंजाबच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला... सोडावं लागलं मैदान

Congress Row : काँग्रेसचे टेन्शन वाढलं ! राज्यातील बडा नेता नाराज, थेट पक्ष सोडण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT