मुंबई

शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभाव जोपासला

CD

शिवाजी महाराज यांनी
सर्वधर्मसमभाव जोपासला
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका धर्माविरुद्ध नव्हते. मुस्लिमांचा त्यांनी कधीही द्वेष केला नाही. त्यांच्या सैन्यात, प्रशासनात मुस्लिमांना गुणवत्तेच्या आधारावर स्थान देण्यात आले होते. ते सर्वधर्मसमभाव जोपासणारे आदर्श राजे होते, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (ता. १२) व्यक्त केली. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी ही चपराक लगावली.

आठवले यांनी इतिहासाचा दाखला देत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मुस्लिमांना त्यांच्या गुणवत्तेनुसार स्वराज्याच्या प्रशासनात आणि सैन्यात मानाचे, विश्‍वासाचे स्थान दिले असल्याची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात धर्म हा निकष न ठेवता केवळ गुणवत्ता हाच निकष लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्य उभारले. त्यांचे मन हे मानवतेचा सागर होते. त्यामुळेच स्वराज्यात अनेक घटनांतून मानवतेचा दृष्टिकोन दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्वधर्मसमभाव आणि मानवता शिकविली असून, त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT