दोन दिवसांत १७,४९५ बेशिस्त चालकांवर कारवाई
मुंबई, ता. १४ : होळी, रंगपंचमीच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांनी शहरात विशेष मोहीम राबवून १७ हजार ४९५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत १.८० कोटी रुपयांचे ई-चलन जारी केले. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन दिवसांत ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त लावून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली गेली. त्यात दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या १८३ चालकांवर कारवाई करण्यात आली. तर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याबद्दल चार हजार ९४९, वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल चार हजार ६५४, सिग्नल मोडल्याबद्दल एक हजार ९४२, विनापरवाना वाहन चालवल्याबद्दल ८२६ वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.