मुंबई

कोस्टल रोडमुळे प्रदूषणात वाढ

CD

कोस्टल रोडमुळे प्रदूषणात वाढ
एमपीसीबीची करणे दाखवा नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : महापालिकेचा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) विभाग प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करीत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) पाहणीत समोर आले आहे. वायू प्रदूषण नियंत्रण विभागाचे सहसंचालक रवींद्र बी. आंधळे यांनी याबाबत प्रकल्प विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गेल्या वर्षीच्या तसेच या वर्षीच्या हिवाळी हंगामात मुंबई महानगर प्रदेशात वायू गुणवत्ता निर्देशांक ‘मध्यम’ आणि ‘खराब’ श्रेणींमध्ये नोंदवले गेले आहेत. मंडळाने याची गंभीर दखल घेत महापालिकेला एक्यूआयनुसार वायू प्रदूषणाच्या विविध स्तरांवर लक्ष ठेवण्यासाठी योग्य कृती करण्याचे निर्देशही दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी कोस्टल रोडच्या बाजूने हवा गुणवत्ता निर्देशांकात वाढ झाली. येथील वायू प्रदूषणाबाबत मंडळाकडे वारंवार तक्रारीदेखील आल्या. मंडळाने या तक्रारींची दखल घेऊन वैयक्तिक सुनावणीदेखील घेतली. मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता ढासळल्याबद्दल न्यायालयाने २०२३ची स्यूमोटो जनहित याचिकेमार्फत स्वतःहून दखल घेत एमएमआर क्षेत्रातील प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी अनेक निर्देशदेखील जारी केले आहेत. यानंतर मंडळातील अधिकाऱ्यांनी कोस्टल रोड परिसराला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत त्यांना प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन होत असल्याचे दिसले. याची गंभीर दखल मंडळाने घेत नोटीस बजावली. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, रस्त्यावरील राडारोडा आदी सामग्रीवर पाणी शिंपडणे, सामग्री लोडिंग आणि अनलोडिंगदरम्यान फॉगिंग प्रणाली बांधकाम साइट्सवर उभारणे, बांधकाम सुरू असलेला परिसर झाकणे आदी निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास काम थांबवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देशही मंडळाने जारी केले आहेत.
...
पाहणीत काय आढळले?
• कोस्टल रोड टप्पा -II (बडोदा पॅलेस ते वरळी एंड) परिसरात कोणतेही आवरण नसताना मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेले साहित्य आढळून आले.
• सामग्री उचलताना पाण्याची फवारणी केली गेली नाही. यामुळे सामग्री उचलताना धूळ उत्सर्जन दिसून आले.
• अंतर्गत रस्त्यावर तसेच ढिगाऱ्यांवर पाणी फवारणीची क्रिया दिसून आली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उत्सर्जन दिसून आले.
• कोणत्याही उपाययोजनांची तरतूद न करता खुल्या जागेत मातीची चाळणी केली गेली.
• साइटला टिनपत्राची पुरेशी उंची प्रदान केलेली नाही.
• आवारात टायर धुण्याची सुविधा कार्यान्वित करताना आढळली नाही.
• वाहनांच्या हालचालीदरम्यान अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड धूळ दिसून येते.
• फॉगिंग/पाणी फवारणी यंत्रणा प्रदान केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Marathi News Live Update : अकोल्यातल्या दहीहंडामध्ये कडाक्याच्या उष्णतेनंतर पावसाची हजेरी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

SCROLL FOR NEXT