बँकेच्या वेल्थ मॅनेजरकडून वृद्धास ७५ लाखांचा गंडा
मुंबई, ता. १८ ः खातेधारकांना आर्थिक व्यवहारांत मार्गदर्शन, सहकार्य मिळावे या उद्देशाने एका अग्रगण्य बँकेने नियुक्त केलेल्या वेल्थ मॅनेजरने वृद्ध खातेधारकास तब्बल ७५ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी जुहू पोलिसांनी सोमवारी (ता. १७) जय मेहता या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला.
जुहू परिसरात राहणारे योगेश कौशल (वय ६०) सेवानिवृत्त आहेत. ते प्रभादेवी येथील खासगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होते. गेल्या वर्षी ते निवृत्त झाले. २००३पासून त्यांचे पगार खाते या अग्रगण्य बँकेत होते. २०१७मध्ये बँकेने आरोपी जय मेहता याची कौशल यांचा वेल्थ मॅनेजर म्हणून नेमणूक केली. गुंतवणुकीसह तक्रारींचे निवारण करण्यासाठी तो कौशल यांच्या संपर्कात होता. तसेच कौशल यांच्या बँक खात्यासोबत अन्य गुंतवणुकीबाबत इत्थंभूत माहिती होती. २०२३मध्ये आरोपीने स्वतःची शेअर ट्रेडिंग करणारी टीम असून, त्यात गुंतवणूक केल्यास १२ टक्के परतावा मिळेल, असा प्रस्ताव कौशल यांच्यासमोर ठेवला. तसेच ही गुंतवणूक फायदेशीर असल्याचे पटवून दिले. जयवर विश्वास बसल्याने कौशल यांनी सुरुवातीस ३० लाख रुपये त्याच्या खात्यावर वळते केले. परतावा म्हणून जयने त्यांना दीड लाख रुपये दिले. त्यामुळे कौशल यांनी स्वतःच्या, पत्नीच्या नावे ठेवलेली मुदत ठेव तोडून आणखी ४५ लाख रुपये जयकडे गुंतवले. त्यांनतर मात्र बाजारातील मंदीचे निमित्त करीत जयने परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केली. गेल्या वर्षी मे महिन्यात त्याने शपथपत्र देत सर्व रक्कम व्याजासह परत करण्याची हमी घेतली. कौशल यांनी त्यावर विश्वास ठेवला; मात्र संधी साधून जय मोबाईल बंद करून पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कौशल यांनी तक्रार दिल्याचे जुहू पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.