ट्रांझिट केबल प्रणाली जूनमध्ये
मुंबई, ता. १८ : डिजिटल व्यवसाय आणि तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील कंपनी एनटीटी डीएटीएतर्फे मलेशिया, भारत, सिंगापूर ट्रांझिट ही समुद्राखालील केबल प्रणाली यावर्षी जूनपर्यंत कार्यान्वित करण्याची घोषणा केली आहे. ही ८,१०० किलोमीटर लांबीची केबल २१३ बिट्स प्रति सेकंद वहनक्षमतेची आहे. ही आशियातील सर्वात मोठ्या केबलपैकी असून, ती मलेशिया, भारत, सिंगापूर व थायलंड यांना जोडेल. ही कंपनी भारतातील आपल्या डेटा सेंटरपैकी दोन तृतीयांश केंद्रे स्वच्छ विजेवर चालवते. २०३० पर्यंत सर्व डेटा सेंटरच्या आणि कामात १०० टक्के स्वच्छ ऊर्जा वापरण्याचा कंपनीचा निर्धार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.