मुंबई

जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी शिबिर

CD

जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी शिबिर
मुंबई, ता. १९ : अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन मंगळवारी (ता. २५) करण्यात आले आहे. हे शिबिर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, पंचशील एम-१, तळमजला, सिद्धार्थ गृहनिर्माण संस्था, माटुंगा लेबर कॅम्प, वाल्मीकी रोड, माटुंगा येथे होणार आहे. या शिबिराचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहरतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करून जातीचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. त्वरित संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. www.bartievalidity.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेस लवकरच सुरुवात होत आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र नसल्‍यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू शकते. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या त्रुटी पूर्तता शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष धनंजय निकम, सदस्य सलिमा तडवी, संशोधन अधिकारी व सदस्य सचिव सुनीता मते यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

Pali News : पतीदेव झाले कारभारी! पाच्छापूर सरपंचांच्या पतीचा ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप, आर्थिक लाभही घेतले

Porsche Car Accident Case : आरोप नव्याने आणि योग्य दृष्टिकोनातून तयार करावेत; दोषारोपनिश्चतीवर बचाव पक्षाचा युक्तिवाद

Pulwama attack: पुलवामा हल्ल्यासाठी ऑनलाईन स्फोटके खरेदी केले; FATF चा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT