भारतातील ग्राहकसेवेतील एआयचा वापर वाढला
८० टक्के ग्राहक सेवांसाठी चॅटबॉटवर अवलंबून; नव्या संशोधनातून स्पष्ट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : समस्या, तक्रारींची स्थिती तपासण्यासाठी, उत्पादनांच्या शिफारशींसाठी आणि स्वयंसहाय्यता मार्गदर्शन उपलब्ध करून घेण्यासाठी ८० टक्के भारतीय ग्राहक आता एआय चॅटबॉटचा वापर करू लागले आहेत. समस्या सोडवण्यासाठी तसेच निर्णय घेण्यासाठी दर सहापैकी पाच व्यक्ती एआय साधनांचा सक्रियपणे वापर करीत आहेत. ‘सर्व्हिसनाऊ’ या एआय प्लॅटफॉर्मने केलेल्या नव्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.
‘सर्व्हिसनाऊ’ ग्राहक अनुभव अहवालानुसार भारतीय ग्राहकांनी गेल्या वर्षभरात १५ अब्ज तास प्रतीक्षा करण्यात घालवले आहेत. एआय आता भारतीय ग्राहकांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये खोलवर रुजले असल्याचे या अहवालातून दिसून येते.
एआय आता भारतीय ग्राहकांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये खोलवर रुजले असल्याचे या अहवालातून दिसून येते. ग्राहक खरेदीसंदर्भातील शिफारशींसाठी एआयवर अवलंबून आहेत. बहुतांश ग्राहक जेवण तसेच खाद्यपदार्थ ट्राय करण्यासाठी एआयवर सूचना अधिक फॉ़लो करताहेत. महत्त्वाचे म्हणजे आर्थिक गुंतवणुकीचे पर्याय निवडण्यासाठी देशातील बहुसंख्य ग्राहक एआय चॅटबॅटचा वापर अधिक करीत आहेत. एकंदरीत आर्थिक निर्णय प्रक्रिया या वेगाने एआयकेंद्री होत असल्याचे चित्र या अहवालातून समोर येते.
व्यवसायांना अधिक वेगवान, अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम ग्राहकसेवेसाठी एआयचा वापर वाढला आहे. मात्र सेवा क्षेत्रात ग्राहकांच्या समस्या प्रत्यक्ष सोडवण्यासाठी दर आठवड्याला सरासरी एक दिवसाहून कमी वेळ देत आहे. आधुनिक एआय सोल्यूशन्स विकसित केल्यामुळे ही कामे वेगाने मार्गी लावली जाऊ शकतात.
एआयचा वाढता वापर
- ८४ टक्के ग्राहक खरेदीच्या शिफारशींसाठी एआय वापरतात
- ८२ टक्के खाद्यपदार्थ, जेवणासंबंधी सूचनांसाठी एआयवर विसंबून
- पाचपैकी चार गुंतवणुकीचे पर्याय तपासण्यासाठी एआय चॅटबॉटचा वापरतात
- ८० टक्के ग्राहक भारतीय चॅटबॉटचा वापर करतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.