टनेल लॉन्ड्री प्रकल्प रद्द करा : मिहिर कोटेचा
मुंबई, ता. २५ : मुलुंडमधील एलबीएस मार्गावरील टनेल लॉन्ड्री प्रकल्प रद्द करण्याची मागणी भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केली. हा प्रकल्प म्हणजे अधिकाऱ्यांचे षड्यंत्र असून, लोकांसाठी हानिकारक असल्याचा मुद्दा त्यांनी विधानसभेत उपस्थित केला. एलबीएस मार्गावरील मुख्य भूखंडावर रुग्णांचे कपडे, कर्मचाऱ्यांचे कपडे, रुग्णांच्या चादरी इत्यादींसह संपूर्ण महापालिका रुग्णालयांचे कपडे धुण्यासाठी टनेल लॉन्ड्री बांधण्याचा घाट घातला जात आहे. या परिसरात ६० मजली इमारती आहेत. मुलुंडची हवा प्रदूषित करण्यासाठी त्यांना टनेल लॉन्ड्री सुरू करायची आहे, असा सवाल कोटेचा यांनी उपस्थित केला. २०२२मध्ये महापालिकेने शिवडी टीबी रुग्णालयात महापालिका टनेल लॉन्ड्री प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रकल्पाच्या निविदांमध्ये हेराफेरी व खर्चात वाढ झाल्याच्या आरोपानंतर महापालिकेने अपुऱ्या भूखंडाचे कारण देत १६० कोटी रुपयांच्या टनेल लॉन्ड्री प्रकल्पाच्या निविदा रद्द केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.