मध्य रेल्वेचा शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक
अनेक मेल, एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम; लोकल रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मध्य रेल्वेकडून कल्याण आणि बदलापूरदरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी (ता. २९) मध्यरात्री ते रविवारी (ता. ३०) विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन मार्गांवर हा ब्लॉक घेण्यात येईल. या स्थानकादरम्यान विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या (आरओबी) ४ गर्डर्सचे डी-लॉन्चिंग करण्यासाठी दोन रोड क्रेनचा वापर करून विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
कल्याण आणि बदलापूर स्थानकादरम्यान हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री दीड ते रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घेण्यात येईल. यादरम्यान अनेक मेल, एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आले असून अनेक लोकल सेवा शॉर्ट टर्मिनेशन, तसेच शॉर्ट ओरिजिनेशन करण्यात येणार आहेत. यामध्ये भुवनेश्वर- सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, विशाखापट्टणम- एलटीटी एक्स्प्रेस, हैदराबाद- सीएसएमटी हुसेनसागर एक्स्प्रेस, होसपेट- सीएसएमटी एक्स्प्रेस, चेन्नई- सीएसएमटी एक्स्प्रेस या कर्जत- पनवेल- दिवामार्गे वळवण्यात येतील. या गाड्यांना ठाणे येथे थांबा देण्यात येईल. तसेच अनेक मेल, एक्स्प्रेस, हॉलिडे विशेष गाड्यांचे गरजेनुसार नियंत्रित केल्या जाणार आहेत. दरम्यान, ब्लॉक कालावधीत अंबरनाथ आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरीय लोकल सेवा रद्द केल्या जाणार असून अनेक लोकल अंबरनाथ येथून शॉर्ट ओरिजनेट केल्या जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.