पालिका रुग्णालयांच्या खासगीकरणाला विरोध
भाजप नगरसेवकाचे आयुक्तांसह पालकमंत्र्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पालिकेने बरीचशी रुग्णालये ‘पीपीपी’ तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे; या निर्णयाला काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनंतर आता भाजपच्या एका माजी नगरसेवकाने विरोध केला आहे. रुग्णालयांच्या खासगीकरणाबाबत मुलुंड येथील भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी मंगळवारी (ता. २५) आयुक्त आणि उपनगर पालकमंत्र्यांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला आहे.
प्रकाश गंगाधरे यांनी दिलेल्या निविदेनुसार, रुग्णांना स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी ओपीडीसाठी पैसे खर्च करावे लागतील; पण आता पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात, केस पेपर्सशिवाय या ओपीडी सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही. भगवती रुग्णालय ‘पीपीपी’वर देण्यासाठी पालिकेने निविदा काढली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांसह, काँग्रेसचे नेते आणि आजी-माजी नगरसेवकांंनी सोमवारी (ता. २४) पालिकेत धाव घेत प्री-बिडिंगही बंद करून पालिकेच्या या योजनेला विरोध केला. आता हा मुद्दा गंभीर होत असून पालिकेच्या या निर्णयाला सर्व प्रमुख पक्षांकडून विरोध होत आहे. या वेळी प्रकाश गंगाधरे यांनी सांगितले, हे रुग्णालय गरीब मुंबईकरांसाठी आहे; पण आता पालिका हे ‘पीपीपी’ तत्त्वावर देण्याचा विचार करीत आहे. याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन हे रुग्णालय पालिकेमार्फत चालवण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे.
रुग्णांना नाहक भुर्दंड
पालिकेने काढलेल्या भगवती रुग्णालयाच्या निविदेत ओपीडीसह विविध प्रक्रियेचे दर निश्चित केले आहेत. सामान्य ओपीडी सल्लामसलतसाठी १० रुपये निश्चित करण्यात आले आहेत; परंतु विशेष ओपीडी सेवेसाठी रुग्णाला २९३ रुपये आणि सुपरस्पेशालिटी ओपीडीसाठी रुग्णाला ३४५ रुपये मोजावे लागतील. तर पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामान्य ते सुपरस्पेशालिटी ओपीडीसाठी केस पेपरची किंमत फक्त १० रुपये आहे, त्यामुळे याचा नाहक भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.