मुंबई

दिशाच्या हत्येत आदित्यसह उद्धव ठाकरेंचाही सहभाग

CD

दिशाच्या हत्येत आदित्यसह उद्धव ठाकरेंचाही सहभाग
वडील सतीश सालियन यांचा पोलिस आयुक्तांना लेखी तक्रार अर्ज

मुंबई, ता. २५ : ‘शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, त्यांचा मित्रपरिवार अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणात आणि अमली पदार्थ उत्पादन, तस्करीत सहभागी होता. ही बाब दिशा सालियन आणि मृत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांना माहीत होती. त्यांचे हे बिंग फुटू शकेल, या चिंतेतून आदित्य व मित्रपरिवाराने दोघांची हत्या केली,’ असा गंभीर आरोप मंगळवारी (ता. २५) दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केला.

सतीश आणि त्यांचे वकील ॲड. नीलेश ओझा यांनी मंगळवारी गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्याकडे हा तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रार अर्जात म्हटले आहे, ‘आदित्य ठाकरे, अभिनेता दिनो मोरिया, सूरज पांचोली, त्यांच्या अंगरक्षकांनी दिशावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. तसेच तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह, तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझे, मालवणी पोलिस ठाण्यातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी दिशाने आत्महत्या केल्याचा आभास निर्माण केला. त्यासाठी चुकीच्या पोलिस नोंदी घेण्यात आल्या. परिस्थितीजन्य पुरावे, घटनास्थळावरील परिस्थिती बदलण्यात आली आणि हे सर्व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आले.’ विशेष म्हणजे या तक्रार अर्जात सतीश यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही आदेशांचा आधार दिला. त्याद्वारे जेव्हा एखाद्या प्रकरणात पोलिस आयुक्त व अन्य अधिकारी आरोपी असतात, तेव्हा अशा प्रकारचा लेखी तक्रार अर्ज हाच फिर्यादीचा जबाब मानावा. हा तक्रार अर्जच प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) समजून कारवाई करावी, असा दावा या अर्जात करण्यात आला आहे. आम्ही तक्रार अर्ज करून आमची जबाबदारी पार पाडली. आता त्यात नमूद आरोपींना अटक करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असे ॲड. ओझा यांनी सांगितले.


गुन्ह्यांची इत्थंभूत माहिती दिशाला!
‘आदित्य चालवित असलेली संघटित गुन्हेगारी टोळी आणि त्यांच्या गुन्ह्यांची इत्थंभूत माहिती दिशाला होती. ती अभिनेता सुशांतची व्यवस्थापक असल्याने तिने ही माहिती सुशांतला दिली. दुसरीकडे अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि आदित्य यांची घट्ट मैत्री होती. आदित्य यांच्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती रियाला सुशांतकरवी मिळाली आणि तिने ही बाब आदित्य यांना सांगितली. त्यानंतर दिशाची हत्या करण्यात आली. तसेच मृत्यूपूर्वी रियाने सुशांतचे घर सोडणे, त्याचा संपर्क ब्लॉक करणे हा या मोठ्या कटाचा भाग होता,’ असा दावा सतीश यांनी या अर्जात केला आहे.

समीर वानखेडे यांची बदली
‘केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रियाला अटक केली. त्या तपासात एनसीबीला आदित्य, दिनो, सूरज यांचा अमली पदार्थ उत्पादन, तस्करीत सहभाग असल्याचे भक्कम पुरावे मिळाले होते; मात्र ते न्यायालयात सादर करणार इतक्यात एनसीबीचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली,’ असेही या तक्रार अर्जात नमूद आहे. ‘मृत्यूनंतर पोलिसांनी दाखविलेल्या दिशाच्या कपड्यांवर रक्ताचा डाग नव्हता, तिला रुग्णालयात नेणाऱ्यांच्या कपड्यांवरही रक्त नव्हते. तिच्या शरीरावर फक्त अत्याचाराच्या खुणा होत्या. तसेच आदित्य आणि अन्य आरोपींचे मोबाइल टॉवर लोकेशन दिशाच्या निवासस्थान परिसरातलेच होते,’ असा दावाही सतीश यांनी या अर्जात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT