नववर्ष शोभायात्रांतून घडणार परंपरेचे दर्शन
तयारी शेवटच्या टप्प्यात; ढोल-ताशा पथकांचा कसून सराव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : नववर्षाच्या स्वागतासाठी विलेपार्ले, गिरगाव परिसरात शोभायात्रांची जोरदार तयारी असून यातून मराठी परंपरेचे दर्शन घडणार आहे. अनेक ढोल-ताशा पथके कसून सराव करीत आहेत. चित्ररथांवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. तसेच मल्लखांबासह दांडपट्टा, पोल मल्लखांब, रोप मल्लखांब या साहसी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी बालगोपाळ सज्ज झाले आहेत.
अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या गिरगावच्या शोभायात्रेत ‘गजर’ हे ढोल-ताशा पथक सहभागी होते. या ढोल-ताशा पथकातील १७०हून अधिक मुला-मुलींची रंगीत तालीम नुकतीच झाली. यंदा शोभायात्रेदरम्यान या पथकातर्फे पारंपरिक वाद्यांची जुगलबंदी रंगणार आहे. महाराष्ट्रासाठी जे चित्ररथ तयार केले जातात, त्यांची ही झलक या वेळेस गिरगावात पाहायला मिळणार आहे. यासाठी तरुण-तरुणींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
...........................
तरुणींच्या बाइक रॅलीचे आकर्षण
गिरगावच्या गल्ल्यागल्ल्यांत रांगोळ्या, वेगवेगळी ढोल-ताशा पथके, मिरवणुका, बाइक रॅली काढल्या जातात. मिरवणुकांसह सर्वात प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे तरुणींचा साज आणि त्यांच्या सजवलेल्या बाइक. नववारी साडी, त्यावर नथ हा शृंगार करून या तरुणी मोठमोठ्या बाइकवर स्वार होतात.
.....
ढोल-ताशांचा नादच वेगळा
बाजी, गजर, मोरया आणि गिरगाव ध्वजपथक हे चार महत्त्वाचे ढोल-ताशा पथक सकाळपासूनच गिरगावचा परिसर दणाणून टाकतात. अनेक तरुण-तरुणींसह सहा-सात वर्षांची लहान मुले याचा सराव करीत असतात.
.......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.