विद्यापीठांमध्ये मियावाकी
जंगल प्रकल्प राबवा
राज्यपालांच्या आयएमसीला सूचना
मुंबई, ता. २८ : आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीने मियावाकी जंगल प्रकल्प राज्यातील विद्यापीठांत राबवून विद्यार्थ्यांनाही वृक्षारोपण कामात सहभागी करावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (ता. २८) येथे केले.
आयएमसीतर्फे राजभवनावर तयार करण्यात आलेल्या मियावाकी जंगलाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आयएमसीच्या उपाध्यक्षा सुनीता रामनाथकर, आयएमसी शताब्दी समितीचे अध्यक्ष राम गांधी, आयएमसी यंग लीडर फोरमचे अतीत संघवी, ज्योत्स्ना संघवी, राजेश चौधरी, आयएमसीचे महासंचालक अजित मंगरूळकर, संजय मेहता, शीतल कालरो उपस्थित होते.
राजभवनात सहा हजार चौरस फूट जागेवर ४८ प्रकारच्या दोन हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. आयएमसी शताब्दी ट्रस्टअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या रोपांमध्ये अडुळसा, अनंत, अंजीर, आवळा, बेल, बोर, चंदन, दालचिनी, कडीपत्ता, काजू, कन्हेर, करवंद, खजूर, मोगरा आदींचा समावेश आहे.
२०१७-१८च्या पर्यावरण अहवालानुसार मुंबईत ३३ लाख झाडे असून मुंबई हे देशातील सर्वात कमी झाडे असलेले महानगर असल्याचे आयएमसीने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.