मुंबई

मुंबई एसटी विभागातर्फे १९ जादा बसफेऱ्या

CD

मुंबई एसटी विभागातर्फे
१९ जादा बसफेऱ्या
सकाळ वृत्तसेवा  
मुंबई, ता.  ३० : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर अनेक जण कुटुंबासह गावी किंवा इतरत्र फिरण्याचे बेत आखतात. त्यामुळे या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘लाल परी’ सज्ज झाली आहे. १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत १९ जादा बस सोडण्याचे नियोजन मुंबई एसटी विभागाने केले आहे.
 मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल आणि उरण या पाच  एसटी आगारांतून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या जादा बसमध्ये सरकारी सवलतींचा लाभदेखील मिळणार असल्याची माहिती एसटी विभागाने दिली.
उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेऊन प्रवाशांची गर्दी होणाऱ्या मार्गावर १५ एप्रिल २०२५ पासून टप्प्याटप्प्याने बसगाड्यांच्या जादा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने या काळात राज्यातील विविध मार्गांवर ७६४ जादा बसफेऱ्या चालविण्यास मंजुरी दिली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतील जादा बसगाड्यांचे तिकीट आरक्षण संगणकीय पद्धतीने उपलब्ध करण्यात आले आहे. एसटी महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल ॲप, बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
----------------
आगार - फेऱ्या 
मुंबई सेंट्रल - ४
परळ - ४  
कुर्ला - ४  
पनवेल - १  
उरण -  ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT